पान:वनस्पतिविचार.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 चलनादि धर्म:—सजीवतत्त्व नेहमी चलनस्थितीत असते असे ह्मणण्यास हरकत नाही. पुष्कळ वेळा सूक्ष्मदर्शक यंत्रांतून अथवा साध्या डोळ्यांना सजीवतत्त्वाची चलनशक्ति दिसत नाही, म्हणून ते चलनस्थितीत नसते, असें अनुमान काढणे बरोबर होणार नाहीं. जडस्थानांतून ( Vacuoles) निरिंद्रिय पदार्थ काढून त्यापासून जीवनकण तयार करणे, तसेच घटकावयवांतून पेशीभित्तिका उत्पन्न करणे, अथवा पेशी विभाग करून पेशीजाल (Tissue } बनविणे, वगैरे गोष्टी ज्या पाहण्यात येतात, त्यावरून सजीवतत्त्वाच्या चंचल स्वभावाची साक्ष चांगली पटते. कित्येक वेळां जीवनकण इकडून तिकडे धांवतांना चांगले स्पष्ट दिसतात. लालघांस अथवा ट्रेडेसकॅनशिया नांवाच्या वनस्पतींत ही चलनशक्ति चांगली स्पष्ट दिसते. ट्रेडेसकॅनशिया फुलांचे पुंकेसरावरील केंस चिमटीने उपटून काचेच्या तुकड्यावर सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहण्याकरितां ठेवावेत, पाण्याचा थेंब त्यावर सोडून पातळ काचेची झांकणी ( Cover slip ) आंत हवा न राहील अशा बेताने ठेवावी. प्रत्येक केंस दोनपासून पांच पेशींचा बनलेला आढळतो. गुलाबी रंगाचा पेशीरस केंसामध्ये थोडा दिसतो. सजीव तत्त्वाचे कण सारखे इकडून तिकडे पेशीच्या परिघाकडील भागांत धांवतांना दृष्टीस पडतात. एवढेच नव्हे, तर ते कण एका पेशींतून दुसऱ्या पेशींत ही जात येत असतात पेशीची भित्तिका छिद्रमय असल्यामुळे त्यांतून जीवनकण खाली वर येत असतात. जर दोन पेशींमधील पडदा छिद्रमय नसता, तर जीवनकण एका पेशींतून दुसऱ्या पेशींत जाणे शक्य झाले नसते. पेशी जुनी होत चालला असतां मध्यपडदाही त्या मानाने जाड होतो, व जेव्हां तो पडदा चांगला जाड होईल, त्यावेळेस पेशींतील परस्पर अंतरचलनादि क्रिया बंद पडतात. पाण्यात आढळणाऱ्या वनस्पतिमध्ये विशेषेकरून ही चलनक्रिया पाहण्यास अधिक सांपडते. जसे, व्हॅलिंसिनेरिया वगैरे. जमिनीवर हवेत वाढणा-या वनस्पतीमध्ये सजीव तत्वाची चलनशक्ति स्पष्ट दिसत नसते, तथापि जोपर्यंत सचेतन वस्तू वनस्पतीमध्ये आहेत, तोपर्यंत अंतरसुक्ष्मचलनादि क्रिया नेहमी सुरू असल्याच पाहिजेत.

 क्षुद्र वनस्पतीमध्ये चलनशक्ति दोन प्रकारची असते. काहीं पेशीस सजीव तत्त्वाच्या चलनशक्तीमुळे गती मिळून त्या पेशी आपली मूळ जागा सोडून