पान:वनस्पतिविचार.pdf/206

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१७८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 मोहोर:–मोहोर म्हणजे व्यक्ती फूल नव्हे, तर पुष्कळ फुलांचा एकत्र असलेला गुच्छ अगर एकच पुष्पदांडीवर पुष्कळ फुलांचा क्रम, असा अर्थ होतो. फुलांची कल्पना क्षुद्वर्गीय व उच्च वर्गीय वनस्पतींत वेगळी असते. क्षुद्रवर्गांत दांडीवर जनन पेशी उत्पन्न होतात त्या रचनेस मोहोर म्हणतात, तसेच सपुष्पवर्गात ज्या दांडीवर फुले येतात त्या रचनेंस मोहर म्हणतात. पांकळ्या अगर सांकळ्या हीं संरक्षक आवरणे आहेत. परागपिटिका व बिजाण्डांची नाळ ह्या सारखी चिन्हें क्षुद्वर्गीय जननपेशी (Spores ) वरही असतात, जसे उच्चवर्गात विशिष्ट प्रकारचे मोहोर आढळतात, तद्वतच क्षुद्रवर्गात सुद्धा वेगवेगळी मोहोरसंबधी रचना असते.

 मोहर ज्या डहाळीवर येतो, त्याचा विचार करणे प्रथम जरूर आहे. जसा पानास देठ असतो, तसा फुलासही देठ असतो; पण कांहीं फुलांत देंठ न येतां तशीच ती फुले त्या डहाळीवर चिकटलेली असतात. जसे-अघाडा, बालकंद, वगैरे. पुष्कळ वेळां एक साधारण दांडी असून, त्यापासून व्यक्तीमात्र फुलास लहान दांड्या येतात. काही ठिकाणी पुष्पदांडी जमिनीतून निघून त्यावर फुले येतात. जसे-कांदा, गुलछबू, भुईकमळ वगैरे. केळ, सुपारी, नारळ, वगैरेमध्ये मोहोराची दांडी मोठी असून लोंबती असते. झेंडू, सूर्यकमळ, झिनिया वगैरेमध्ये ती दांडी आखूड असून तिचा जोर खुंटला असतो. तिचे अग्र निमुळते न होतां बोथट व रुंद होते. त्या पसरट भागावरच झेंडूंतील लहान फुलें चिकटली असतात, व हा भागच पुष्पाधार होतो.

 फांदीची रचना जशी नियमित अगर अनियमित असते, तसेच मोहोरहीं नियमित व अनियमित असतात. जी कल्पना नियमित फांदीची असते तीच कल्पना नियमित मोहोराविषयी लागू पडते. म्हणजे अग्राकडील वाढ खुंटून बाजूस नवीन वाढ सुरू होते. प्रथम अग्रावरील फुल उमलून त्यांत बीज़ तयार होते. मागाहून बाजूकडील फुले उमलतात, व त्यांत बीजे उत्पन्न होतात. ह्यांत मुख्य पुष्पदांडीचे नियमन होते म्हणून त्यास नियमित Definite म्हणतात, जसे-जवस, एरंडी, पानशेठिया वगैरे.

 ज्या मोहोरांत पुष्पदांडी ( Peduncle ) ची वाढ न खुटतां अग्राकडे ती सारखी वाढत राहते, तसेच जुनी फुलें खाली बुड़ाकडे येत जाऊन वरचे