पान:वनस्पतिविचार.pdf/198

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

संरक्षक आवरणे असतात. आवरणानंतर आतील भागीं खोबऱ्यासारखा पोषक बलक ( Nucellus ) असून त्या बलकांत गर्भकोश ( Embryo-Sac ) वाढत असतो. केवळ हा बलक संपेपर्यंत तो वाढतो असे नाही, तर कधी कधी बाह्य आवरणापर्यंत त्याची वाढ होते. कोशांत एक केंद्र असून त्यापासन गर्भधारणा होण्याचे पूर्वी आठ केंद्रे उत्पन्न होतात. मध्यभागी दोन केंद्रे एकमेकांश मिलाफ पावून त्याचे एकच केंद्र होते. हे केंद्र पहिल्या केंद्रापासून ओळखण्याकरितां त्यास द्वितीयक केंद्र म्हणतात. उरलेल्या सहा केंद्रांपैकी तीन केंद्रे वरील बाजूकडे व तीन केंद्रे खालील बाजूकडे जातात. खालील भाग असणारी केंद्रे गर्भधारणक्रियेस उपयोगी पडत नाहीत. मध्यभागी असणारे द्वितीयक केंद्र ( Secondary Nucleus) ही ह्याच प्रकारचे असते. मात्र वरील तीन केंद्रापैकी, एका गर्भाण्ड ( Egg-cell ) असून दोन त्यास मदत करणारी असतात. म्हणजे गर्भकोशांतील सर्व केंद्रांमध्ये एक गर्भाण्डच मुख्य असून ह्यांत खरें स्त्रीतत्त्व असते. ह्याच तत्वाचा पुरुषतत्त्वाशी मिलाफ होऊन बीजोत्पादन होत असते. तूर्त आपण अण्डाच्या बाह्यांगाचे वर्णनाकडेच वळू. मागाहून पुनः गर्भधारणेचा विचार करण्यात येईल.

 बीजाण्डाची दोन्ही आवरणे एकाच जागी परस्पर संलग्न झाली असतात. तेथूनच नाळेतून येणारे पोषक अन्न गर्भकोशांत अगर आंतील बलकाकडे पोहोंचविले जाते. निरनिराळ्या फुलांतील बीजाण्डांत रंध्र व अन्न येण्याची जागा वेगवेगळी असते. कुटूच्या फुलांत रंध्र अग्रांकडे असून बुड़ाकडे ही जागा असते. तसेच नाळेशी संबंध दाखविणारी खूण रंध्राजवळ असते, मुळे, मोहरी, आळीव, वगैरे फुलांतील अण्डांत रंध्र, नळीची खूण, व आवरणांची संयुक्त जागा ही तिन्ही जवळ जवळ असतात. जासवंद, भेंडी, कापूस, वगैरेमध्ये अशाच प्रकारची रचना असते. काहींमध्ये रंध्र व नाळेची खूण, एका बाजूस असून दुसऱ्या बाजूस आवरण-संयुक्त जागा असते. असली अण्डे पुष्कळ फुलांत आढळतात. जसे काकडी, खिरे, सफरचंद वगैरे.

 अण्डाशयांत बीजाण्डांची संख्या अमूकच असते, असें कांहीं निश्चित नाही. एकापासून पुष्कळ अण्डे एका अण्डाशयांत असू शकतात. झेंडू, सूर्यकमळ, झिनिया, करडैै वगैरे फुलांतील स्त्रीकेसरदलांत एकच बीजाण्ड असते. धने