पान:वनस्पतिविचार.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२० वे ].    बीजाण्ड व गर्भधारणा.    १६९
-----
प्रकरण २० वें.
---------------
बीजाण्ड व गर्भधारणा.
---------------

 अण्डाशयामध्ये बीजाण्डे (Ovules) नाळेशी (Placenta) चिकटली असतात. ज्या प्रकारचा परागपीटिकेचा व परागकणांचा संबंध असतो, तोच संबंध नाळ व अण्डे ह्यामध्ये असतो. परागकणांमध्ये पुरुषतत्त्वजननपेशी, (Male spore) तसेच बीजाण्डामध्ये स्त्रीजननपेशी (Female Spore) असतात. क्षुद्रवर्गामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या जननपेशी असून त्यांपासूनच उत्पत्ति होत असते. प्रत्येक जननपेशीस स्वतंत्र वाढ करण्याची शक्ति असून ती उच्चवर्गामध्ये फार अस्पष्ट अगर बहुतेक गुप्त असते असे म्हटले असतां चालेल. क्षुद्रवर्गामध्ये पुष्कळ वेळां सर्व वनस्पतिशरीर असल्या जननपेशीपासून उत्पन्न होते. पुढे एखादे वेळी पुनः त्या प्रकारच्या दोन्ही जननपेशी उत्पन्न होऊन परस्परसंयोग पावून गर्भधारणा होते. गर्भधारणेमुळे त्यांचे विशिष्ट बीज तयार होते. उच्च वर्गामध्ये जननपेशींची (Spore ) स्वतंत्रपणे उगवण्याची शक्ति नष्टप्राय असल्यामुळे परस्परसंयोग होऊन बीजोत्पादन करणे भाग असते. बीजापासून वृक्ष तयार झाल्यावर पुनः फुलें येऊन त्यामध्ये पूर्वीसारख्या जननपेशी उत्पन्न होतात, व त्या जननपेशींचा संयोग होऊन पुनः बीजोत्पत्ति होते. येणेपमाणे हे रहाटगाडगे चालले असते. कारण जननपेशींपासून वनस्पतिशरीर वाढून पुनः त्यावर पुरुष व स्त्रीव्यंजक निराळ्या जननपेशी उत्पन्न होऊन त्यांचा परस्पर संयोग होतो, व त्या संयोगामुळे गर्भधारणा घडून बीज उत्पन्न होते. हे बीज योग्य परिस्थितीमध्ये वाढून पूर्वीप्रमाणे वनस्पतिशरीर तयार होते, व त्यावर पुनः पूर्वीप्रमाणे जननपेशी उत्पन्न होतात. मात्र क्षुद्रवर्गामध्ये पुष्कळ वेळां पुष्कळ दिवस स्त्री-पुरुष संयोगशिवाय जननपेशी स्वतंत्रपणे वनस्पतीची वाढ करितात, हाच काय ते मुख्य फरक असतो.

 बीजाण्ड:-- हे वाटोळे असून त्यावर एक रंध्र (Micropyle) असते, हे रंध्र परागकण आंत शिरण्यास उपयोगी पडते, ह्यासही परागकणाप्रमाणे दोन