पान:वनस्पतिविचार.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८ वे ].   पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश Calyx पुष्पमुगुट Corolla).   १५७
-----

आढळतात. मध सेवनाकरिता किंवा चमत्कारिक रंगास मोहून जेव्हां पांकळ्यांंवर ही फुलपांखरे बसतात, त्यावेळेस त्यांची शरीरें परागकण धुळींनी भरतात. फुलपाखरांचा धर्म एका फुलांवरून दुसऱ्या फुलांवर उड्डाण करीत व विहार करीत जाण्याविषयी महशूर आहेच. ही फुलपांखरें केवळस्त्रीकेसर फुलांवर बसली असतां मध सेवन करण्याकरितां पाकळ्यांत धडपड करून शिरतात. ह्यावेळेस त्यांच्या बरोबर आलेले परागकण परागवाहिनीला ( Style ) लागल्यावर हळु हळु त्यांतून अण्डाशयांत शिरून गर्भधारणा घडते, तेव्हां अशा ठिकाणी सुंदर रंग गर्भधारणा घडवून आणण्यास अप्रत्यक्ष उपयोग असतात ह्यांत संशय नाहीं. ह्या चमत्कारिक रंगाची नैसर्गिक वीज असते. तसेच पाकळ्यावर केस फारसे नसतात, पण कधी कधी आंतील बाजूस केंस उलटे येतात. ह्या उलट्या केंसाचाही उद्देश वरील रंगासारखाच असतो. वर्तुळांत जेव्हां कीटक शिरतात, त्यावेळेस ह्या केसामुळे बाहेर पडण्यास अटकाव होतो. पण कीटक धडपड करून बाहेर येतात, त्यावेळेस वरील प्रमाणे त्यांची अंगें परागधूलीमय होतात. पूर्वीप्रमाणे पुनः जर ते कीटक केवळस्त्रीकेसर फुलांवर बसले, तर त्या परागकणाचा फायदा बीजाण्डास होऊन गर्भधारणा साधली जाते.

 सांकळ्याप्रमाणे आकार, शिरा, बाजू, अग्रे, वगैरे पानासारखी पाकळ्यांतही असतात. पानासारखा पाकळ्यास कधी कधी देठ असतो. जसे, मोहरी, पिंक वैगेरे. पिंक फुलांत पाकळ्या झालरीदार असतात. कधी कधी अशी झालर गुलाबी जासवंदीमध्ये आढळते. पाकळ्या सांकळ्याप्रमाणे सुट्या अथवा संयुक्त असतात. द्विदल-वनस्पतीमध्ये फुलास चार अगर पांच पांकळ्या असतात, व एकदल वनस्पतीमध्ये तीन पांकळ्या आढळतात. कांहीं फुलांत पांकळ्या सारख्या आकाराच्या असून व्यवस्थित होतात. जसे, कापूस, मोहरी, स्ट्राबेरी, नास्पाती वगैरे. पण काही फुलांत त्या सुट्या पण वेड्यावांकड्या असतात. जसे आगस्ता, पावटा, तुळस, कर्पूरी वगैरे.

 आळीव, मुळे, सलघम, शिरस, तिळवण, वगैरे फुलांत पाकळ्या सुट्या असून त्यांचे व्यवस्थित स्वस्तिक बनते. स्वस्तिकाकृती पांकळ्या म्हणजे पाकळ्याची एक जोडी समोर व दुसरी आडवी असते; व एकूण ह्या पाकळ्या चार होतात. 'स्वस्तिकाकृती' (Cruciform) फुलांचा वर्ग एक निराळा केला आहे.