पान:वनस्पतिविचार.pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १५१
-----

( Superior ) म्हणतात. जेव्हां अण्डाशय उच्चस्थ असतो, त्यावेळी इतर तिन्ही वर्तुळे अधःस्थ ( Inferior) असतात, पण जेव्हां अण्डाशय प्रथम वर्तुळाशी संयुक्त असतो तेव्हां त्यास अधःस्थ अण्डाशय म्हणतात. अधःस्थ अण्डाशय असतांना उरलेली तिन्ही वर्तुळे उच्चस्थ असतात, अधःस्थ अगर उच्चस्थ ही संज्ञा संयोगाप्रमाणे वर्तुळास दिली जाते. पेरू, मटलाई, दोडके, वगैरे फुलांत अण्डाशय अधःस्थ असून इतर तिन्ही वर्तुळे उच्चस्थ (Superior ) असतात. तंबाखू, मिरची, तूर, उडीद वगैरे फुलांत अण्डाशय उच्चस्थ असून पहिली तिन्ही वर्तुळे अधःस्थ असतात. द्वितीय व तृतीय वर्तुळे पुष्कळ वेळां परस्पर संलग्न असतात. बहुतकरून जेव्हां पाकळ्या संयुक्त असतात अशा वेळी पुंकेसर पाकळ्यांशी चिकटलेले असतात, जसे, कण्हेर, तंबाखू, वगैरे. कांदे, गुलछबु, भुईकमळ वगैरेमध्ये पहिलें व दुसरे वर्तुळ एकाच रंगाचे असून त्या दोहोंत फारसा फरक नसतो. अशा प्रकारची फुलें एकदल-वनस्पतीमध्ये पुष्कळ आढळतात.

 कमळामध्ये फुलांतील वर्तुळाची मांडणी फिरकीदार असते. सांकळ्या बाह्यभागी असून पाकळ्या पांढऱ्या अथवा गुलाबी असतातै. येथेही सांकळया व पांकळ्या ह्यामध्ये फारसे अंतर नसते. कांहीं सांकळयाापासून पाकळ्या बनत असतात. कांहीं पाकळ्या मध्यभागाकडे लहान लहान झाल्या असतात. त्यांचा आकार जणू पुंकेसराप्रमाणे झाला असतो. गुलाब अथवा जासवंद ह्या फुलांत पुंकेसरापासून पाकळया बनतात; पण कमळामध्ये पांकळ्यापासून पुंकेसर तयार होतात. म्हणजे एका वर्तुळांतील दलें कमी अधिक वाढीप्रमाणे दुसऱ्या वर्तुळांतील दलाप्रमाणे बनत असतात. बागेमध्ये गुलाब, मदनबाण, मोगरा इत्यादि फुलांत पांकळ्यांची वाढ अधिक होते. तसेच त्यांमधील पुंकेसर अथवा स्त्रीकेसर दलें पूर्णावस्थेस पोहचत नाहींत, अथवा त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असते. पण त्याच्या मूळ अगर जंगली स्थितीत पाकळ्या फार मोठ्या असून सर्व वर्तुळाची वाढ होते. पुंकेसर अथवा स्त्रीकेसरदलें कमी झाल्यामुळे वंशवर्धन खुटेल असे वाटण्याचा संभव आहे; पण नैसर्गिक तजवीज वेगळी असते. शिवाय झाडांची परंपरा, कलमें, चष्मे, दाब, वगैरे करून वंश राखिला जातो. कलमाने मूळ गुण व जातीधर्म अस्सलरीतीने पुढील रोप्यांत कायम राहतात. बीज पेरून जी रोपे तयार