पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

आल्कोहोल व इथर यांमध्ये हा रंग त्वरित विद्रूत होतो. आल्केलीच्या

द्रवांत कपिल विद्रुत करून त्या मिश्र रंगीत द्रवांत सल्फ्युरिक, नैत्रिक किंवा हैड्रोक्लोरिक यांपैकी कोणतेही खनिज अ‍ॅसिड मिळविले म्हणजे पिवळ्या रंगाचा दाट सांका वेगळा होतो. हा सांका हवेत राहिल्याने पिवळा रंग ज्यास्त जुळतो. रंग देणारे लोक याच कृतीने हवेच्या कार्याने रंग खुलवितात. दक्षिणेत कपिलाचा रंग रेशमास देण्याची कृति खालीलप्रमाणे आहे. चार भाग कपिलाची पूड, एक भाग तुरटीची पूड आणि दोन भाग सोडाखार या तीन जिनसा तिळाचे तेलांत खलून नंतर पाण्यात कढवितात. परंतु असे न करितां कपिलाची पूड व पापडखार एकत्र करून ते मिश्रण वर सांगितल्याप्रमाणे कढविल्यानेही रंग तयार होतो. अमृतसर येथे सोडासाराच्या ऐवजी एका झाडाच्या राखेचा उपयोग करतात. या राखेत पोट्याशिअम कार्बोनेट असतो. पाव शेर पाण्यांत छटाक राख मिसळून, नंतर त्यांत कपिलाची पूड टाकतात व ते मिश्रण कढवितात, बरेंच कढविल्यावर त्यांतील सर्व रंगीत द्रव्य वेगळे करण्याकरितां त्यांत थोडा चुना टाकतात; म्हणजे रंगीत द्रव तयार होतो. हा रंग पक्का बसण्याकरितां या द्रवांत कोणी कोणी तुरटी अगर थोडा डिंक मिसळतात. हे जिन्नस त्यांत टाकले नाहीत, तरीही हरकत नाही. मात्र रंग द्यावचाचा रेशमी कपडा त्या रंगीत द्रवांत दोन तीन वेळ बुडवून वाळविल्याशिवाय रेशमावर पिवळा रंग चांगला खुलत नाहीं. कपिलाची पूड फार महाग असते. या झाडाच्या सुकलेल्या फुलांचा व कळ्यांचाही तांबडा रंग होतो. ही फळे फार सुवासिक असतात, यामुळे यांचे अत्तरही काढतात, त्यास ‘सुरंगी अत्तर ' असे म्हणतात. सुरंगांच्या लांकडाच्या फळ्या चांगल्या निघतात. हे लांकूड़ इमारतींच्या व डोलकाठ्यांच्याही उपयोगी पडते. कपिलाची पूड पोटांत घेतल्यास रेच होऊन जंत पडतात. खरजेवरही या पुडीचा उपयोग करतात.

--------------------
३२ वेळू.

 वेळूला संस्कृतांत वंश असे नांव आहे. वेळूमध्ये कांटेरी व गोडा अशा दोन मुख्य जाति असून, शिवाय माणगा, चिवा, मेस, बांबू वगैरे अनेक पोटजाति आहेत. कांटे कळक जाड असून, सुमारे पन्नास साठ हात पर्यंत उंच वाढतात. गोडा कळक बारीक असून वीस पंचवीस हात उंच वाढतो. धातूमध्ये जसे लोखंड अत्यंत उपयोगी, तसा वृक्षांमध्ये वेळू अतिशय उपयुक्त आहे. वेळूची बेटें हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व भागांत आहेत. सह्याद्रीच्या तळ-प्रदेशात वेळूची जी मोठमोठाली बेटें आहेंत, ती इतकी दाट आहेत की, त्यांत पक्षांचाही शिरकाव होणे कठीण आहे. वेळूचीं कांहीं कांहीं बेटे इतकी कठीण असतात