पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


      वेळू.      ४७

-----

की, त्यांवर तोफेच्या गोळ्यांचाही मारा लागू होत नाही. वेळू ही तृणवर्गातीलच वनस्पति आहे. ही गोष्ट कदाचित् कांहीं लोकांस चमत्कारिक वाटेल, परंतु सुक्ष्म विचाराअंती त्यांस कळून येईल की, तृणाचे आणि वेळूचे पुष्कळ गोष्टींत सादृश्य आहे. उदाहरणार्थः– गवत, बोरू, लव्हा, यासारखाच वेळू अंतर्वर्धक असून सरळ वाढत जातो. तसेच कोणत्याही तृणजातीय वनस्पतीस बीं आलें म्हणजे जसा त्याचा शेवट होतो, तसा वेळूला बी आले म्हणजे वेळूचा शेवट होतो. फरक इतकाच की, वेळूला सुमारे साठ वर्षांनी बी येते आणि तृणजातीय बाकीच्या वनस्पतींना एक वर्षाच्या आंत बी येऊन त्यांचा शेवट होतो. रामेश्वर, गोकर्ण, कर्नाटक वगैरे भागांत वेळूची राने पांच पांच सहा सहा कोस एकसारखी लागलेली आहेत. वेळूला बीं आलें म्हणजे कांटा फुलला असे म्हणतात. बीं येण्याच्या सुमारास वेळूच्या दर कांड्याला सुमारे चार चार अंगुळे गुच्छ येतात. आणि आंत गव्हासारखा दाणा उत्पन्न होतो, तो दाणा पिकला म्हणजे वेळू मरूं लागतात. वेळूला हे जे बी येते, त्याचा गरीब लोक दुष्काळासारख्या खडतर प्रसंगी धान्याप्रमाणे उपयोग करतात. असे रा० गोविंद नारायण यांनी आपल्या 'उद्भिज्जन्य पदार्थ' नामक पुस्तकांत नमूद करून ठेविलें आहे. ते लिहितात, -' वेळूचे बी जमा करण्याची कृति अशी आहे की, बी पिकू लागले म्हणजे त्या बेटाच्या आसपास कुंपण घालितात आणि त्या कुंपणाच्या आंत जे बी गळून पडते, ते गोळा करून आणितात; व जरूर लागेल तेव्हां त्याला सड देऊन ते दळतात. आणि त्याच्या भाकरी, पोळ्या वगैरे पदार्थ करितात. सन १८१८ साली कोकणांत वेळूला कांटा आला होता, त्यावेळी शेंकडों खंडी वेळूचे बी लोकांनी सांठवून ठेविलें व दुष्काळाच्या प्रसंगी हजारो लोकांनी त्यावरच निर्वाह केला. सध्यांच्या सुधारलेल्या व यांत्रिक कलेच्या उत्कर्षाच्या काळांत वेळूच्या बियासारख्या अगदीं निःसत्व धान्याचा उपयोग करण्याची पाळी येण्याचा विशेष संभव नाहीं; हे जरी खरे आहे, तरी पूर्वी वेळूच्या बियाचा धान्याप्रमाणे लोक उपयोग करीत असत, हे वरील अवतरणांतील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात येईल. बांबूच्या अनेक वस्तु करितात व तो पुष्कळ कामांत उपयोगी पड़तो. बांबूचें ओमण घराला घालितात व भिंतीऐवजी कूड करण्याकडे त्याचा उपयोग करितात. टोपल्या, सुपे, पंखे, हारे, हातऱ्या, विरल्यांचे सांगाडे, हातांत धरण्याच्या काठ्या वगैरे अनेक उपयुक्त वस्तु बांबूच्या करितात, हे सर्वांना विदितच आहे. चीन देशांत खुर्च्या, कोचें, पलंग वगैरे नानाप्रकारचे जिन्नस बांबूचेच करितात. पालख्यांना ज्या दांड्या असतात, त्या बांबूच्याच करतात. वेळूच्या कोवळ्या कोंबाला वासोटे असे म्हणतात. या वासोट्याची भाजी व