पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

नमस्तेचा कर्कश पुकारा, असला प्रकार नाही. पण आलेल्यांचा अनादर नि उपेक्षाही नाही. प्रत्येक मुलांचे स्वतंत्र अस्तित्व प्रत्यही जाणवते. जेवण करून आचारी निघून जातो. मुले हाताने वाढून घेतात. स्वच्छता स्वत: करतात. अशा संस्थेत बालसदनाच्या तुलनेने कर्मचारी प्रमाण कमी असले तरी ते मुलांच्या संख्येपेक्षा नेहमीच अधिक असते. हे सांगून आपणास खरे वाटणार नाही. या संस्थेतील कर्मचा-याची पदे सांगितली तर संख्या सांगायची गरज उरणार नाही. संचालक (प्रशासन), संचालक (अर्थ), कार्यालय अधीक्षक, रुग्णालय प्रमुख (डीन), मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, आशुलिपिक (स्टेनो), कार्डिओलॉजिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, लिपिक, विभागप्रमुख, पर्यवेक्षक, काळजीवाहक, शिक्षक, प्रशिक्षक, मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक, आहारतज्ज्ञ, आचारी, सफाई कामगार, माळी, ड्रायव्हर, धोबी, मुकादम (इमारत देखभाल) शिवाय गरजेप्रमाणे बोलविण्यात येणारे अस्थितज्ज्ञ, न्यूरॉलॉजिस्ट, दंतवैद्य इ. वेगळेच. वेगवेगळ्या विभाग/संस्थांत १५0 लाभार्थी असलेल्या या संस्थेत १९८ मान्य कर्मचारी वर्ग होता. पैकी शासनाने १६३ पदे भरली होती. उर्वरित पदे भरावी व मुलांची आबाळ थांबवावी म्हणून कर्मचारी संघटनेची पत्रके तेथील फलकावर पाहून तर मी थक्कच झालो.
 तिथे प्रत्येक लाभार्थीवर ४४० फ्रैंक्स (१३२० रु.) दरमहा खर्च केले जातात. तेथील अधीक्षकाचे वेतन मासिक ३६000/- रुपयांइतके होते. हा केवळ समृद्धीचा प्रश्न नाही. शासन या कल्याणकारी योजनेकडे कसे पाहते याचे निदर्शक आहे. रशियामध्ये व युरोपमध्येही दुस-या महायुद्धानंतरच्या काळापासूनच आजअखेर अनाथ मुलांना विशेषाधिकार असलेला एकमेव सामाजिक घटक', (Privileged Class) म्हणून पाहिले जाते. आपल्याकडे मंडल आयोगाद्वारे सामाजिक क्रांतीच्या घोषणा केल्या जातात. त्यातही या वर्गास स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही स्थान मिळू शकू नये याचे आश्चर्य वाटते.
 तिथे अशा संस्था मुलींसाठी स्वतंत्रपणे पण एकाच परिसरात चालवल्या जातात. लैंगिक भेदाचा बाऊ तिथे नाही. त्यामुळे मुले-मुली स्वच्छंद नि सहजपणे वावरत असतात. विशिष्ट वयानंतर मुलींच्या संस्था स्वतंत्र केल्या जातात. पण तिथे घराघरातून मिळणारे स्वातंत्र्य येथील मुलींना तितक्याच सहजपणे मिळत असते. अशा एका संस्थेतील ‘कॉमन रूम मध्ये सिगारेट पिणा-या व सिगारेट पीत हॅलो करणाच्या मुली पाहून मी स्तंभितच झालो. या गोष्टी बरोबरच मुलींना स्वावलंबी करण्याकडे संस्थेचा कटाक्ष असतो. शिक्षण, प्रशिक्षण व सेवायोजन हा संस्थेच्या जबाबदारीचा भाग मानण्यात

वंचित विकास जग आणि आपण/१०४