पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

येतो. मुलीस लग्नाचे स्वातंत्र्य असते. मुलीची निवड प्रमाण मानण्याकडे कटाक्ष असतो. प्रेमविवाहास मान्यता दिली जाते पण त्याचे धोकेही समजावून दिले जातात. तेथील संस्कृतीत ‘लादणे' हा प्रकार नसल्याने तो संस्थेतही असत नाही. मुलींना लैंगिक शिक्षण, आरोग्य संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास, बेकरी, गृहशोधन इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. मुली संस्थेत राहून नोकरी करू शकतात. त्यांनी ती करावी म्हणून प्रयत्न केले जातात. सर्व मुलेमुली एकाच शाळेत जात नाहीत. प्रत्येकाच्या आवडी व कुवतीप्रमाणे पाठ्यक्रम दिले जातात.
 पुनर्वसन कार्य करणाच्या तिथे स्वतंत्र संस्था असतात. अशी पॅरिसमधील संस्था 'लेस ऑर्फलीन अॅपरंन्टीस डी ऑटेओल' पाहता आली. मुले, मुली, १८ वर्षांपर्यंत बालगृह, सुधारगृहात राहू शकतात. त्यानंतर १९ ते २२ वयोगटातील मुला-मुलींच्या पुनर्वसनासाठी आपल्याकडे अनुरक्षण गृहांसारख्या संस्था तिथेही आहेत. परंतु त्यांचा दर्जा, कार्यपद्धती आपल्यापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाची आहे. या संस्था निवास, भोजन, व्यवसाय मार्गदर्शन, सेवा नियोजन, व्यवसाय प्रशिक्षण इ. सर्व सुविधांनी युक्त असतात. पॅरिसमधील या संस्थेत इलेक्ट्रॉनिक व प्रिंटींग असे दोन विभाग होते. त्यातील प्रिंटींग प्रेस पॅरिसमधील अत्याधुनिक प्रेसपैकी एक मानली जाते, असे सांगण्यात आले नि खरेही वाटले. 'पेपर टू प्रिंट' या तत्त्वावर चालणाच्या प्रेसमध्ये छपाई, टाईपसेटिंग, बायडिंग, कटिंग, रोलिंग, पेस्टिंग, ब्लॉक मेकिंग, डिझायनिंग असे किती तरी विभाग होते. प्रत्येक विभागाचे स्वतंत्र पाठ्यक्रम, त्यास आवश्यक संदर्भग्रंथ, प्रशिक्षक, यंत्रसामग्री होती. विशेष म्हणजे प्रशिक्षणातील वापरला जाणारा हा छापखाना भरपूर फायदा मिळवत होता. फायद्याचा काही वाटा विद्यावेतन म्हणून विद्यार्थ्यांना दिला जातो. तो त्यांच्या निर्वाहभत्त्या व्यतिरीक्त असतो. विद्यार्थी प्रशिक्षित झाले की त्यांच्या व्यावसायिक पुनर्वसन व स्वावलंबनासाठी संस्था साहाय्य करते. त्याची परतफेड अनिवार्य असते. येथे विद्यार्थ्यांना भोजन, निवास, क्रीडा, रंजन, आरोग्य इ. सर्व सोयी उपलब्ध असतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असतात. अनाथ मुलांशी आपला संपर्क आहे याचे भान कर्मचारी/शिक्षकांना सतत ठेवावे लागते. त्यासाठी मानसशास्त्रीय, वर्तनविषयक प्रशिक्षण येथील कर्मचारी, पालक वर्गास देण्यात येत असते. ही संस्था खासगी होती, पण शासनाचे अनुदान तिला मिळत होते. अशा संस्थांच्या विकास योजनांवर शासन प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून देत असते. आपल्याकडील अशा अनुरक्षण गृहांची सद्य:स्थिती लिहिली गेली तर पुनर्वसनाची प्राथमिक निवा-याची

वंचित विकास जग आणि आपण/१0५