पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/585

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६८ लो० टिळकांचे केसरींतील लेखं. किंबहुना सगळे आयुष्य खर्च करण्याचा ज्यांनीं निश्वय केला आहे इतकेंचं नव्हे तर ज्यांच्या हातून याप्रमाणें प्रत्यक्ष कृति झाली आहे त्यांच्या मृत्यूबद्दल देशांतील प्रत्येक मनुष्यास वाईट वाटेल यांत शंका नाहीं. पण आमची स्थिति याहून फारच भिन्न आहे. पहिल्यापासून एक उद्देश मनांत ठेवून तो सिद्धीस नेण्याच्या साधनांचा विचार करण्यांत व ती प्राप्त करून घेण्यांत कित्येक वर्षे एकमेकांस जीं सुखदुःखें अनुभवावी लागली त्यांच्या पुनःपुन्हां स्मरणानें आमचे चित्त अगदीं उदास व अस्वस्थ होऊन आयुष्याची अशाश्वतता आमच्या डोळ्यांपुढे मूर्तिमेत उभी रहात आहे ! रा० रा० गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सन १८५६ सालीं झांलाँ व पुढे यांची गृहस्थिति अगदीं गरिबीची असल्यामुळे आपल्या आसांच्या आश्रयानेंच रत्नागिरीस व वन्हाडांत विद्याभ्यास करून सन १८७५ सालीं म्याट्रैिक्युलेशन परीक्षा पास होऊन हे डेक्कन कॉलेजांत आले. तेथे त्यांच्या पुढील परीक्षा एकसारख्या उतरत गेल्या व सन १८७९सालीं यांस दक्षिणाफेलोची जागा मिळाली. या सालच्या सप्टेंबर महिन्यांतच स्वतंत्र शाळा आणि कॉलेज काढण्याचा वर सांगितलेला विचार ठरावेण्यांत आला. पण या सालीं यांची एम. ए. ची परीक्षा न उतरल्यामुळे आणखी एक वर्ष कॉलेजांत राहून सन १८८० सालीं एम. ए. ची परीक्षा पास झाल्यावर हे न्यू इंग्लिश स्कूलच्या मंडळींत येऊन काम करूं लागल. शाळेत व कॉलेजात असतांच यांस मराठी लिहिण्याचा नाद असे; व डेक्कन कॉलेज ग्यादरिंगकडून एका मराठी निबंधाबद्दल यांस बक्षीसही मिळालें होतें. यांच्या मनाची प्रवृत्ति कशी काय होती हें वर सांगितलेंच आहे, व त्या प्रवृत्तीस अनुकूल असें इतर समवृत्तीच्या खह्यांचे प्रोत्साहन मिळाल्यावर त्यांनीं मेोठ्या हौसेनें व आनंदासें विद्याप्रसाराच्या कामी आपलें आयुष्य खर्च करण्याचा निश्वय केला; व तो त्यांचा निश्चय शेवटपर्यंत ढळला नाहीं. कॉलेजांत असता यांचा आवडीचा विषय इतिहास हा होता; व त्याच्या अध्ययनानें ह्यांच्या मनाची स्वाभाविक प्रवृत्ति उत्तरोत्तर दृढ होत गेली. न्यू. इंग्लिश स्कूलमध्यें आल्यानंतर त्याच सालीं केसरी व मराठा दोन पलें काढण्याचे ठरून त्यांपैकीं केसरीच्या एडिटराचे काम यांजकडे देण्यांत आले. हें काम त्यांनीं कसें बजाविलें, तें करीत असतांना काय काय संकटें आलीं व त्यांतून पार पडण्यास काय काय करावे लागलें इत्यादि गोष्टी सर्वश्रुत आहेत. त्यांचा उल्लेख येथे करण्याची जरूर नाहीं. गोपाळरावजचिा व त्यांच्या मित्रांचा मुख्य उद्विष्ट कायांखेरीज इतर बाबतींत पहिल्यापासूनच थोडा मतभेद होता; परंतु सन १८८८ सालापर्यंत तो विशेष रीतीनें व्यक्त करण्याची कोणासही आवश्यकता दिसली नाहीं. या सालच्या सुमारास डेक्कन एज्युकेशन सोसायटति व अन्यत्र ज्या कांहीं गोष्टी घडून आल्या त्यामुळे कसरी आणि सुधारक अशीं दोन पत्रे करावीं लागली. कोणताही हातीं घेतलेला विषय मार्मिक आणि जेोरदार रीतीनें प्रतिपादन करण्याची गोपाळ