पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/584

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डैक्कन एज्युकेशन सोसायटीतील पांचवा मृत्यु ! ५६७ मनांत धरून त्याकरितां आजन्म दारिद्य, विपात, उपेक्षा अगर निंदा सहन करण्यास तयार होण्याचे ज्यांनीं धैर्य दाखविले आहे असे महाराष्ट्रांत किंबहुना आमच्या विपन्न देशांत सध्यां तरी थोडेच पुरुष निपजतात. न्यू इंग्लिश स्कूल आणि फग्यूसन कॉलेज या दोन संस्था इतक्या लोकप्रिय का झाल्या आहेत याचा लक्षपूर्वक जो केोणी विचार करील त्यास आम्ही काय म्हणतें तें नीट कळून येईल. डेक्कन आणि एल्फिन्स्टन कॉलेजातून बी. ए. अगर एम. ए. थेोड झाले आहेत असे नाहीं; पण गरिबोस न भिता अथवा सुखाची अगर संपत्तीची आशा न धरितां ज्या लोकांच्या पैशानें-सरकार विद्याखात्यावर जो पैसा खर्च करितें तो लोकांचाच आहे. आपणास पाश्चिमात्यविद्येचा संस्कार घडला आहे त्यांचे आपण इल्लींच्या देशकालानुरूप कोणत्या रीतीनें उतराई व्हावें याचा कोणकेोणी विचार केला व कोण करताहेत हें पाहिले म्हणजे रा. आगरकर याची योग्यता सहज कळून येईल. ज्या केोणत्याही राष्ट्रांत आपल्या विद्येचा, अकलेचा, हुषारीचा आणि कर्तबगारीचा म्हातारपणीं नव्हे तर भर उमेदीत लोकोपयोगी कामाकडे इमानानै आणि नेकीनें उपयोग करणारे शकडा नाहीं तरी हजारीं तरी काहीं गृहस्थ निघत नाहीत तें राष्ट्र जिवेत असून मेल्यासारखेच आहे असें आम्हीं समजते. आमचे हे विचार पुष्कळास एककल्ली व काही अंशीं चमत्कारिक वाटतील; पण ज्या कारणांनीं सन १८७९ साली रा. रा. गोपाळ गणेश आगरकर यानीं स्वतंत्र शाळा व कॉलेज काढण्याचे काम हातीं घेण्याचे ठरविले, त्यापैकींच वरच्या त-हेचे विचार हे मुख्य होत; व याचकरिता गोपाळरावजींच्या बरोबरीच्या किंवा मागील पुढील ग्रंज्युएटापेक्षा त्याची योग्यता आमच्यामतें अधिक आहे. न्यू इंग्लिश स्कूल आणि फग्यूसन कॉलज काढण्याचा ज्यांनी सेकल्प केला होता, त्यापैकी काहीं गृहस्थांचा लवकरच कसा मतिभ्रश झाला हें ज्यांस माहित आहे, त्यांस वर लिहिल्याप्रमाणे आयुष्य घालविण्याचा निश्चय करतेवेळीं मन किती घट्ट करावें लागतें थाची कल्पना येईल. परीक्षा पास होऊन कॉलेजांतून बाहेर पडणा-यांस दोन मार्ग दिसत असतात. दोन्हीही मागै प्रथमारंभीं जरा सारखेच बिकट असतात पण आपल्या अंगीं कर्तबगारी असल्यास एका मार्गाचे अवलंबन केल्यानें लवकरच आपणास व आपल्या कुटूबास सुखसाधनें प्राप्त होतील असें एकीकडे दिसत असतें, आणि इकडे दुसरा मार्ग स्वीकारला तर आमरण गरिबी आणि शारिरीक हाल हे निश्चित असतात. अशा वेळीं जाणून बुजून दुस-या मार्गानें जाण्यास फारच थोडे विवाहित व कुटुंबवत्सल गृहस्थ तयार होतात याचा आम्हास पूर्ण अनुभव आहे; व एवढ्याकरिताच रा. रा. गोपाळराव आगरकर यांचा आयुष्यक्रम महत्त्वाचा व सुशिक्षित लोकांनी कित्ता घेण्याजोगा आहे असें आम्ही म्हणतों. सर्वच मनुष्याचीं सर्व मर्ते नेहमी जुळतात असें नाहीं; पण कोणत्याही लोकोपयोगी कार्याकरिता आपली सर्व विद्वत्ता केवळ \s R