पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/583

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. होता त्यांच्यापुढे ही दुःखाची काहाणी सांगण्याचा आमच्यावर अकल्पित प्रसंग यावा ! ‘स्वजनस्य हि दुःखमग्रतो विवृतद्वारमिवोपजायते' असें जें कालिदासानें एके ठिकाणीं म्हटले आहे त्याचा हल्लींच्या प्रसंगीं आम्हांस तर पूर्ण प्रत्यय येत आहे. असो; रा. गोपाळराव आगरकर यांच्या वियोगानें आम्हांस जेो शेक होत आहे तो अांवरून त्यांच्यासंबंधानें शवटच्या कर्तव्यांपैकीं आजचा लेख हैं एक दुःखकारक कर्तव्य आहे असे समजून तें केलें पाहिजे. संस्कृत न्यायशास्रांत कांहीं पदार्थाचे लक्षण, त्यांच्या अभावी काय स्थिति होते किंवा असते याजवरून सांगितलेले असतें; व पुष्कळदा अशा रीतीनें एखाद्या गोष्टीचे स्वरूप जितकें चांगले कळून येतें तितकें ती वस्तु दृष्टिगोचर असताना येत नाहीं. कोणताही मनुष्य सर्वथैव निर्दोषी सापडणें कठीण आहे; पण मनुध्याची किंमत करणें ती त्याच्या अंगीं जे चागले गुण असतात त्यावरूनच होत असते. प्रि. आगरकर यांच्या अंगीं असे कोणते गुण होते हें चांगलें लक्षांत येण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटीस यांच्यासारखा मनुष्य पुनः मिळण्यास किती दिवस लागतील याचा वाचकांनीं विचार करावा म्हणजे झाले. रा. रा. आगरकर हे कांहीं मूळचे सपन्न अगर सुखी नव्हते; आपला विद्याभ्यास यांस बहुतेक गरीब स्थितीतच करावा लागला; व विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर यांच्या आप्तवगांची व जगरूढीप्रमाणे यांची स्वत:चीही इच्छा आपली स्थिति जेणेकरून सुधारेल तो उद्योग हातीं घेण्याविषयींची असावी असें कोणासही सहज वाटेल. विद्याभ्यास परिपूर्ण होऊन कॉलेजांतून आपल्या गुरूचा निरोप घेऊन विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात तो काल त्यांच्या आयुष्यांत मोठ्या महत्त्वाचा, उत्साहाचा आणि उमेदीचा असतो. अशा वेळीं बहुतेक ‘महाजनो येत गतः स पंथाः' या न्यायाने एखाद्या नवीन मार्गास लागण्यास सहसा धजावत नाहींत हे आम्हीं सांगावयास पाहिजे असें नाहीं. सरकारी नोकरीत शिरून शंभराचे दोनशें, दोनशाचे चारशे आणि चारशाचे हजार रुपये होण्याची ज्यांनीं हांव धरिली, आणि ती हांव परिपूर्ण झाल्यावर खाविंदचरणीं खचीं घालून जी कांहीं थोडीशी शक्ति अगर उमेद अवशिष्ट राहिली असेल ती पेन्शन घेऊन ‘हरि हरि' म्हणण्याचे कामीं खर्च करण्याचा संकल्प केलेले व हा स्वतःचा आयुष्यक्रम आटोपून स्वस्थ ब8ण्याचा प्रसंग आपणावर येतो न येतो तोंच आपल्या चिरंजीवासही त्याच मागांत ढकलून देऊन दोन पिढ्यांची काळजी दूर झाली म्हणून आपणास कृतकृत्य मानणारे युनिव्हर्सिटीचे पदवीधर किंवा सुशिक्षित गैरपदवीधर असे आजपर्यंत बरेच लोक निर्माण झाले आहेत व होतील; किंबहुना भर्तृहरीनें म्हटल्याप्रमाणे अशा किंवा ह्यासारख्याच दुस-या रीतीनें स्वार्थसाधन करीत असतां त्यातलेत्यांत सार्वजनिक उपयोगाचीं कार्मे करणारे गृहस्थही कांहीं सांपडतील, नाहीं असें नाहीं. पण विद्येर्ने आणि अंगच्या हुषारीनें आपण इतर लोकांचाच क्रम स्वीकारल्यास चांगले यश संपादन करूं अशी बहुतेक खात्री वाटत असतां केवळ एक लेोकेापयेोगी हेतु