पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/565

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

い?く लो० टिळकांचे केसरींतील लेख. सर्वोसमक्ष आम्ही सूक्ष्म व शुद्ध गणितालें केलेले पंचाग चालू करण्यास तयार आहीं असें सांगितले आहे. पंचांगशोधन हें सतत चालणारे कार्य असून त्यास वेधशाळेची अत्यंत आवश्यकता आहे; शिंदसरकारानीं उज्जनीची वेधशाळा दुरुस्त करण्याचा हुकूम सोडल्याची तार नुकतीच मला आली आहे. शिंदेसरकारचे त्याबद्दल आपण आभार मानले पाहिजेत. केवळ इंग्लंडांतच वेधशाळा असून आमचे काम भागणार नाही. ही विद्या हिंदुस्थानात जिवंत कशी राहील हाच मुख्य प्रश्न आहे. तो सोडविण्याचे काम लोकाचे व राजेरजवाडयांचेही आहे. ग्रहाच्या गतिस्थिति वर्तविणें येवढेच ज्योतिषशास्त्राचे ध्येय नाहीं. भुवनसंस्थेचा प्रश्न हातीं घेऊन सृष्टीच्या रचनचे गूढ उकलण्याच्या उद्येोगास तें लागले आहे. तर आतां एकमतानें तुमच्यापुढे असलेल्या प्रश्नाचा निर्णय करा आणि लोक ज्याची आतुरतेनें प्रतीक्षा करीत आहेत त्याचा प्रसंगोचित निकाल लावा, याप्रमाणें भाषण होऊन पहिल्या दिवसाचे काम संपले. यानंतर सर्व ज्योतिषशास्त्रज्ञ प्रतिनिधींच्या सभा रविवारीं व सोमवारीं सकाळीं अशा दोनदां भरल्या. त्यांत वादविषयक सर्व गोष्टींचा खल होऊन सर्वानुमतें ( सायनवादी काहीं ज्योतिषीखेरीज करून ) कायमचा निकाल ठरला. मुंबईस शके १८२६ मध्यें भरलेल्या ज्योतिषांच्या सर्भेत जेो निर्णय झाला त्यास अनुसरूनच या ज्योतिषसमेलनांत निर्णय करण्यांत आला. विशेष इतकाच कीं, वर्पमान व अयनगति यासंबंधानें जी दुबरेजी पूर्वीच्या ठरावातून होती ती काढून तोच अर्थ आता अधिक स्पष्ट केला गेला व अयनांश २२ व २३ याचे दरम्यान घ्यावे असें जै मोघम ठरलें होते त्यास अनसरून शके १८४० च्या आरंभीं म्हणजे आता बारा वर्षानंतर ते २३ ध्यावे व वेधशाळा निघाल्यावर वेधानुरूप ध्याव असें ठरविले. यामुळे पूर्वीच्या निर्णयातील सर्व अनिश्चित भाग निश्चित झाला. दुसरा कोणताही फेरफार केलेला नाही. सभेर्ने केलेला निर्णय प्रश्नोत्तररूपार्ने खालीं दिला आहे. १ प्र ० सौरवर्षमानं किं ग्राह्यम् १ उ ० सौरवर्षमाने सूर्यसिद्धातोक्तं वेधोपलब्धबीजसंस्कृतं स्वीकार्यम् । २ प्र ० अयनगतिमानं किं ग्राह्यम् ! उ ० अयनगतिमानं वास्तविक्तं वेधीपलब्धं ग्राह्यम् । ३ प्र० निरयणारंभस्थानं पूर्वै: केि गृहीतम् ? उ० सद्यःप्रचलितपूर्व सिद्धांतग्रंथेषु निःशरेरेवतीयोग तरै प्रारंभस्थानं ग्रह्णीतम् । तदेव निरयणंराशिनक्षत्रत्वंक्रारंभस्थाने ग्राह्यम् । ४ प्र० अयनांशाः किर्यतो ग्राह्या: ? उ ० अयनाशास्तु सद्य:प्रचलितकरणग्रंथागतांशसमीपस्थास्त्रयोविंशतिमिता: १८४० शकारंभे ग्राह्या: । वेधशाला स्थापनानंतरं वेधानुरूपा अयनांशा ग्राह्याः ।