पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/566

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्योतिषसंमेलनं. ५४९ इतर बाबतीत पूर्वीच्या म्हणजे १८२६ शके परिषदेत झालेलें ठराव अक्षरशाच कायम ठेवलेले आहेत. वरप्रमाणें झालेला निर्णय सर्वास जाहीर करण्याकरितां संमेलनास जमलेल्या सर्व प्रतिनिधींची व प्रेक्षकांची जाहीर सभा सोमवारीं संध्याकाळीं ६ वाजतां नूतन आर्यभूषण नाटकगृहांत भरविली. त्या सर्भेत अध्यक्ष ली. टिळक यानी झालेला निर्णय सर्वास निवेदन केला. नंतर निर्णयानुसार पुढील काम करण्याकरितां एक कमिटी नेमण्याचा दुसरा ठराव सर्भेत पसार झाला. ती कमिटी अशी:अध्यक्ष लो. बाळ गंगाधर टिळक, उपाध्यक्ष प्रो. विश्वनाथ बळवंत नाईक, कार्यकारी सभासद, वे. शा. सं. विनायक शास्री खानापूरकर, रा. बाबासाहेब पटवर्धन, प्रो. गोविंद सदाशिव आपटे, प्रो. रघुनाथ नारायण आपटे, रा. व्यंकटेश बापूजी केतकर, वे. शा. सं. रघुनाथशास्री वेलणकर, रा. सा. निलकंठ विनायक छत्रे, रा. श्रीधर दामेदिर भिडे, वे. शा. सं. रघुनाथ शास्री पटवर्धन (सेक्रेटरी). याशिवाय आणखी साहाय्यकारी मंडळाही नेमली असून त्यांत ठिकठिकाणचे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. व दोहॅीतही जास्त नांवें घालण्याचा कमिटीस अधिकार दिला आहे. तिसरा ठराव ग्वाल्हरचे श्रीमत महाराज माधवराव शिंदे, अलिजाबहाद्दर यानी उजयिनी येथे वेधशाळा स्थापन करण्याचे आश्वासन देऊन व पचागशोधनसभेचे आश्रयदाते होऊन ज्योतिषशास्त्राचे प्रगतीस जी मदत केली आहे तीबद्दल महाराजाचे आभार मानण्याचा असून तो सवांनुमत टाळ्याच्या गजरात प! से इंग्लाले. हे ठराव झाल्यानतर ज्यांनीं समेलनास मदत केली अशा कित्येक मंडळीचे म्हणजे संमेलनास जागा देणा-या मंडळीचे, प्रो. अबदुल करीमखां याचे व स्वयंसेवकाचे आभार मानण्यात आल. नंतर अध्यक्षांनी सर्व अडचणींचे निराकरण करून सवाँस संमत होईल असा निर्णय होण्यास जी अमेोलिक मदत केली व जिच्यामुळे संमेलनाचे काम यशस्वी झालें तीबद्दल त्याचे आभार मानण्याचा ठराव पास झाला. या ठरावास उत्तर देतांना ली. टिळक म्हणाले, या वेळेस माझे आभार मानण्यापेक्षा ज्यांनीं नवीन पंचांगाचा आपल्याकडे प्रथमतः पुरस्कार केला व त्याबद्दल अनेक त्रास सोसले असे जे आमचे गुरु कै. केरुनाना छत्रे त्याचे स्मरण करून त्याच्या ऋणांतून उत्तीर्ण होण्याची खटपट करा. हें कार्य त्याचे देखतच झाले असतें तर उत्तम होर्ते; निदान त्याच्या पुढील पिढींत जरी हें काम तडीस गेले तरी मेोठे कार्य केले असें होईल. नंतर अध्यक्ष व इतर सर्व मंडळी यास हारतुरे अर्पण केल्यावर सभेचे काम संपलें.