पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/564

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्योतिषसंमेलन. *A?v9 अदृष्ट नाहीं सूर्य, चंद्र व ग्रह ह्यांचे वेध घेऊन त्याचीं गतिमानें ठरविण्याचे प्रयत्न आजचे नाहीत. ८० ० ० वर्षापासून असे प्रयत्न चालले आहेत व त्यामध्यें क्रमाक्रमाने सुधारणा होत आहे. आपल्या सिध्दातातील मते खेोटीं नाहींत; परंतु तीं त्या त्या सिध्दांताच्या वेळची खरीं आहेत, गाणित कितीही सूक्ष्म वर्तविले तरी कालांतरानें त्यांत फेर पडणारच. खुद्द वेदांगज्योतिष पाहा त्यांचे वर्षसायन आणि मध्यम त्यामुळे तें मार्गे पडून सिध्दान्त ग्रंथ उदयास आल. सिध्दान्त ग्रंथानीं तिथी स्पष्ट केल्या आणि वर्षमान फार सूक्ष्म केलें. परंतु अर्वाचीन वेधानी तेही मान बरोबर नाहीं अस अनुभवास आलें. आपल्या इकडे हा प्रश्न उपस्थित झाला त्याचे कारण आपल्या इकडील पूर्वीच्या पिढीतील विद्वानास वेधशाळेत अनुभव घ्यावयास सांपडला हें होय. कै. केरूनाना, मद्रासचे रघुनाथशास्री आणि काशीचे बापूदेवशास्री ह्यांना सरकारी वेधशाळेमध्यें प्रत्यक्ष शिक्षण मिळाले त्याचेच फल पंचागशेाधनाचा प्रश्न हें होय. दृक्प्रत्यय खेोटा होऊँ शकत नाहीं. गणित दृक्प्रत्ययाशीं न जुळेल तर गणित सुधारले पाहिजे. संतोषाची गोष्ट अशी कीं, दुर्बिणीनें वेध घेऊन दृक्प्रत्यय पाहण्याचे जें काम कैलासवासी केरूनानांच्या वेळेस नास्तिकपणाचे लक्षण समजलें जात होतें, तेंच आतां म्हणजे १९०४ सालच्या मुंबईच्या सर्भेत कोणासही नापसंत झालें नाहीं, त्या सभेनें जी महत्त्वाची कामें केलीं तीं हीं कीं, पंचागात निरयन वर्षमान घेण्याचे ठरविले. कारण ग्रहांची गति सागतांना ती स्थिर बिंदूपासून सांगणेंच जास्त सोईस्कर व शास्त्रशुद्ध आहे. ज्या ता-याना आम्ही आज ६००० वर्षे अश्विनी, भरणी, कृतिका असे ओळखीत आली, त्यांना सायनमताप्रमाणे पाहता वाटेल त्या नक्षत्राचे नाव मिळणें संभवनीय आहे. पण तें योग्य नाही. वेदात सायन मानाचाच स्वीकार केला आहे असे सायनवादी म्हणतात, परंतु वेदात आगगाडी आहे असे म्हणण्यासारखाच हा प्रकार होय ? हें ठीक नव्हे. सूर्य किंवा चंद्र मृगाजवळ आहे असे म्हटल्यावर ज्याला हजारों वर्षे मृगच म्हणून लोक दाखवीत आले आहेत त्याच नक्षत्राजवळ तो असला पाहिजे. तेथे काल्पनिक मृग उपयोगी नाहीं. असो, मुंबईच्या सभेर्ने आणखी एक कामगिरी केली. ती कोणती तर सिद्धातातील आकड्याना बीजसंस्कार देण्याची परवानगी होय. तिसरी महत्त्वाची गोष्ट आरंभस्थान ठरविणें इं होय. आरंभस्थान म्हणजे मोजण्याला प्रारंभ करण्याचा एक खुट. आपण अश्विनीपासून मोजतों; परंतु शकापूर्वी ६००० वर्षामार्गे अश्विनी उदगयनारंभीं होत्या. व तेथून १८० अंशांवर चित्रा होती. आश्विनीचा आरंभ आपण रेवतीपासून मानतों त्यामुळे रैवत चैत्र असे पक्ष उत्पन्न झाले आहेत. अयनांशारंभस्थानीं शक्य असल्यास कोणतीही एक दृश्य तारा धरा. पण अयनाशाच्या वादांत पंचांगशोधनाची संधि घालवू नका. सध्यां लोकमत पंचागशोधनास अनुकूल आहे. सर्व लोक शुद्ध-पंचांग वापरण्यास उत्सुक आहेत. वैष्णवस्वामी नाहीं येथे