पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/563

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ ६ लो० टिळकांचे केसरींतील लेख तरी ज्या केोणास ही हौस पुरवून घ्यावयाची असेल त्यानें ती खुशाल पुरवून ध्यावी, आम्ही त्याच्या आड येऊं इच्छित नाहीं. मि. मॅटेिग्यूसाहेब हिंदुस्थानांत स्वत: येत आहेत व नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तारेवरून इकडे खुला दरबार ठेवण्याचा त्यांचा इरादा आहे. तेव्हां प्रत्येक जातीनें आपापले हक्क त्यांच्यापुढे आपापल्या खास प्रतिनिधींच्या द्वारें ठेवून आपला स्वतःचा मतदारसंघ बनवून घ्यावा. ब्राह्मण लोकांना मात्र या तत्त्वाचा अंगिकार करण्याची इच्छा नाहीं. आम्ही ब्राह्मण म्हणून आम्हाला इतके प्रतिनिधि द्या असें ते कधीही मागणार नाहीत, व तसे दिले तरी ते घेणार नाहीत. मग सर्व कायदेकौन्सिलांत एकही ब्राह्मण न आला तरी चालेल. आहेत-आमचे इतर जातवाले आहेत-ते आम्हां ब्राह्मणांच्या हक्कांचे रक्षण करितील अशी आमची पक्की खात्री आहे ! सरकार ब्राह्मणांवर हल्लीं रुष्ट आहे हें प्रसिद्धच आहे. तेव्हां बिचाया ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतरांच्या पाठीशीं न पडावें तर काय करावें ? : नावेवर गाडा, गाड्यावर नाव ' अशी जगाची राहाटीच आहे ! ब्राह्मणेतर सर्व जातींनीं तरी संतुष्ट राहार्वे म्हणजे झालें. तात्पर्य, ब्राह्मणेतर जातीच्या बांधवांना आम्हांस एवढीच विनंती करावयाची आहे कीं, स्वराज्याच्या मागणीला त्यांनी कोणत्याही सबबीवर आज हरकत करूं नये, स्वराज्याचे अधिकार आपणास कोणते व कसे व का पाहिजत हें निभेयपणें सांगावें, ब्राह्मणांना क्षणभर बाजूस वगळून, किंबहूना ते आज अस्तित्वांत नाहीत असेही वाटेल तर घटकाभर समजून, सर्व ब्राह्मणेतर जाति वरिष्ठ व कनिष्टसुद्धां एकत्र होऊन त्यांनी आपापसात पोक्त विचार करून आपणास स्वतंत्र प्रतिनिधि किती पाहिजत व आपापल स्वतत्र मतदारसंघ कसे बनवावे हें ठरवून स्टेटसेक्रेटरीस कळवावें. स्वराज्ययोजनेच्या या बाबीपुरतें ब्राह्मणवर्ग आनंदानें मौन स्वीकारील व ब्राह्मणेतरांच्या मागणीस बिलकूल विरोध करणार नाहीं. या बाबतीत आपले खरें मत बोलावयास जाऊन स्वतःस स्वार्थी म्हणवून घेण्याची त्यांना इच्छा नाहीं. स्टेटसेक्रेटरीपुढे स्वराज्य योजनेच्या इतर बाबी राष्ट्रहिताच्या दृष्टीने त्यांना माडता येतील व त्याच ते माडतील. 米 ज्योतिषसंमेलन शनिवार ता, २७-१०-१९१७ पुणें. अध्यक्ष-ली. टिळक यांचे भाषण. ज्योतिषशास्र हें फार पुरातन आहे. प्राचीन ग्रीक, खाल्डियन, इजिप्शन व चिनी इत्यादि लोकही सूर्यचंद्रांच्या गति निश्चित करून त्यावरून आपली धर्मकृत्यें करीत. जोति:शास्र हें अनुभवजन्य आहे. त्याचे साध्य प्रत्यक्ष आहे (केसरी-ता. ३० माहे आक्टोबर सन १९१७ )