Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/559

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४२
लो. टिळकांचे केसरीतील लेख.

 प्रस्तुतच्या वादाचे प्रथमतःच दोन भाग आपोआप पडतात. पहिला असा कीं, ब्राह्मणेतरांस खरोखरच स्वराज्य नको कीं काय ? व दुसरा असा कीं, त्यांना- ही जर स्वराज्य हवे तर ते हरकत तरी कोणत्या गोष्टीला घेतात ? पैकी पहिल्या प्रश्नासंबंधानें आम्हांस हैं नमूद करण्यास आनंद वाटतो कीं, मद्रासकडे काय किंवा इकडे काय, ब्राह्मणेतराकडून आजवर प्रकट झालेल्या विचारामध्ये मुळांत स्वराज्याच्या मागणीलाच पूर्ण विरोध असा थोडाच दिसून येतो, व त्याचे कारण- ही उघडच आहे. ब्राह्मणेतराच्यातर्फे म्हणून जे गृहस्थ आज वादास प्रवृत्त झाले आहेत ते स्वतः सुशिक्षितच असल्यामुळे हिंदुस्थानातील हल्लींची एकतत्री राज्य- पद्धति त्याना झाली तरी मनापासून आवडणे शक्यच नाही. इंग्रज लोकांनी दिलेल्या शिक्षणाचा गुणच स्वातत्र्यप्रियता हा असल्यामुळे सुशिक्षित लोक ब्राह्मणेतर असले तरी त्यांनाही आपण आपल्याच देशात नादान व खुरटलेले राहावें आणि आपला सर्व कारभार परक्यांनीं आपली संमति न घेता करावा ही गोष्ट कशी आवडणार ? ब्राह्मणवर्गाच्या मानीव सामाजिक जुलमापासून का होईना पण स्वतंत्र होण्याच्या बुद्धींत जे स्वाभिमानाचे बीज आहे तें राजकीय विचाराच्या भूमीतही फलद्रूप झालेच पाहिजे. आपणास मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळाव्या व ब्रिटिश व्युरॉ- कसीने चालविलेल्या राज्यकारभारावर आपल्यातील लोकमताचे दडपण असावें अशी महत्त्वाकांक्षा ब्राह्मणेतर झाला म्हणून त्याच्या मनात उद्भवल्याखेरीज कशी राहणार ? ब्राह्मणवर्गाचा पाडाव व्हावा अशी ब्राह्मणेतराना इच्छा होणे स्वाभा विक आहे असें घेऊन चालले, तरी केवळ ब्राह्मणाना अपशकून करण्याकरिता आपल्या राजकीय महत्त्वाकाक्षेचे नाक कापून घेण्यासही ब्राह्मणेतर कबूल होतील इतका अघमपणा आमच्या ब्राह्मणेतर बंधूमध्ये वसत असेल, त्याच्या मनुष्यत्वाची इतकी हानि झाली असेल, असे मानण्यास आमचे मनच घेत नाहीं. अर्थात् ब्राह्मणवर्ग क्षणभर विचारातून अजिबात वगळला आणि केवळ ब्राह्मणेतर व ब्रिटिश ब्युरॉकसी यांच्या पुरतेच पाहिले तर स्वराज्य हवें असेंच ब्राह्मणेतराना वाटले पाहिजे, व तसें त्याना आज वाटत आहेही. हल्लींच्या मुख्य वादात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर या विशिष्ट उपवादाचीं जीं जाळीं दुर्दैवाने पसरली आहेत, तीं या एकंदर प्रश्नाचा खोल विचार करणाऱ्या वाचकानें बाजूस सारून या खन्या मुद्दत्याचा लक्ष्यवेध मार्मिकपणाने करण्यास त्यानें शिकले पाहिजे.
 अशा रीतीने पहिल्या प्रश्नाचे नास्तिपक्षीं उत्तर दिल्यास वादाचें क्षेत्र आपोआप बरेच कमी होते. आम्हास स्वराज्य हवें पण त्याची कोणतीही योजना निश्चित होतांना ' ब्राह्मणेतराच्या हक्काचे योग्य संरक्षण झाले पाहिजे' असा या वादांतील दुसरा मुद्दा आहे या मुद्दयासंबंधाने आम्ही एकदमच असें सागून मोकळे होतों कीं, ब्राह्मणेतराच्या हक्काचे संरक्षण करण्याची कोणतीही सूचना पुढे आल्यास ब्राह्मण लोक तिचा विचार नुसत्या सहानुभूतीनेच नव्हे तर थोड्या- बहुत दिलदारीनेही करण्यास तयार आहेत. कै. ना गोखले यानीं आपल्या