पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/558

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वराज्य, ब्राह्मण व ब्राह्मणेतर ५४१ पुढायांनीं धीर न सोडता या गोष्टीचा लवकर विचार करण्यास लागले पाहिजे व त्याप्रमाणें ते लागतील अशी आम्हांस आशा आहे. किंबहुना हेंच फेरोजशहा यांचे खरें स्मारक होय असें आम्ही समजतों. ज्या नेटानें, धैर्यानें, करारीपणानें किंवा ज्या निभैय उद्योगार्न व जेोरदार वक्तृत्वानें सर फेरोजशहा यानीं ४५ वर्षे देशकार्य साधलें त्याच गुणाची देशकार्यासाठीं आता तितकीच किंवा त्याहूनही अधिक जरूर राहणार हे निश्चित होय; करिता सदर फेरोजशहासारखा करारी व मानी पुढारी नाहींसा झाल्याबद्दल नुसता शोक न करता ही परंपरा पुढे कायम ठेवून इतर पुढारीही कालस्थितीस अनुसरून हे पवित्र देशकार्य निर्धास्तपणे पार पाडण्याच्या उद्येगास लागात, आणि सर फेरोजशहा यास त्याच्या सत्कृत्यासाठी त्याच्या धर्माप्रमाणे सद्रती प्राप्त होवो,अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून हा दुख: حاج वट्याचा लेख येथे संपवितो. ॐस्वराज्य, ब्राह्मण व ब्राह्मणेतर मि. मॉटेग्यु हे स्वराज्यविषयक चर्चा करण्याकरिता हिंदुस्थानात येणार असे जाहीर झाल्यापासून स्वराज्याच्या चळवळीस विरोध करणा-या आमच्या काही ब्राह्मणेतर बंधूंनी बरीच उचल खाल्ली आहे, व ब्राह्मणजातीसबधाने आपल्या मनात उचंबळत असलेली खळमळ ओकण्यास अवेळी सुरुवात केली आहे. तथापि त्यातल्या त्यात अानदाची गोष्ट इतकीच कीं, स्वत: ब्राह्मणेतर असून स्वराज्याच्या चळवळीस विरुद्ध नसणारे असेईो पुष्कळ प्रतिष्ठित लोक वेळीच पुढे येऊन वरील आत्मघातकी प्रकारास आळा घालू लागले आहेत. यामुळे या अनिष्ट वादास भलतेच स्वरूप न येता, अखेर समुद्रातील मोठ्या माशाने लहान मासा खाऊन टाकावा त्याप्रमाणे ब्राह्मणेतरातला स्वराज्यास अनुकूल असणारा मोठा पक्ष स्वराज्यास विरोध करणाच्या लहान पक्षास खाऊन टाकील अशी आशा वार्दू लागली आहे. ब्राह्मण व ब्राह्मणेतर हा विरोध मद्रास इलाख्यांत जितका दृढमूल आहे तितका तो इतर प्रीतात नाही. मुंबई इलाख्यात तो अगदींच नाहीं असें म्हणवत नाहीं, व स्वत:ची शिंगें मोडून वासरात शिरणारे कित्येक सुशिक्षित ब्राह्मणेतर गृहस्थ या नसत्या भाडणावर पुंकर घालघालून त्याची उष्णता कृत्रिम रीतीनें वाढवू पाहात आहेत. तथापि एका हातानें कितीही प्रयत्न केला तरी त्याला टाळी वाजवितां येणें शक्य नाईीं; व या आगुंतुक वादात आपल्या मनाची समता बिलकुल ढळू न देण्याचा ब्राह्मणवर्गाचा पुरा निश्चय आहे. यामुळे हा कलहाग्नि प्रदीप्त होईल अशी आम्हास बिलकूल भीति नाहीं. तथापि हा वाद निघालाच आहे म्हणून या बाबतीत ब्राह्मण वर्गासबधाने केोणाचा गैरसमज राहूं नये येवढ्याकरितांच या विषयावर सामान्यत: दोन शब्द लिहिण्याचे आम्हीं आज योजिले आहे.

  • (केसरी, ता. १८ सपटेंबर १९१७).