पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/560

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वराज्य, ब्राह्मण व ब्राह्मणेतर ५४३ भाषणांतून व लेखांतून आणि मृत्युसमयीं करून ठेविलेल्या स्वराज्ययेोजनंतून ब्राह्मणेतरवगाँच्या हक्कांचे संरक्षण करणें योग्य आहे असें ठिकठिकाणीं प्रतिपादिले असल्याचे प्रसिद्धच आहे. आणि लो. टिळकांनीही लखनौ येथील राष्ट्रीय सभेच्या प्रसंगीं मुसलमानबंधूंच्या महत्त्वाकांक्षेसंबंधानें जे उद्गार काढले ते लक्षात घेतले म्हणजे स्वराज्याच्या बाबतीत ब्राह्मणेतरांना किती प्रेमळपणानें वागविण्यास ते तयार आहेत हें दिसून येतें. “ कायदकैौन्सिलात उद्या एक वेळ सगळेच ब्राह्मणेतर आले तरी मला चालतील, पण तेथें लोकनियुक्त हिंदुलोकाचे प्राबल्य असले पाहिजे, परक्याचे किंवा सरकारनियुक्ताचे प्राबल्य नसले पाहिजे ” हे त्यांचे शब्द कोणाईो ब्राह्मणेतरानें विसरू नये. हे शब्द अगदीं शब्दशः कोणी घेणार नाही. ते तात्पर्यार्थानेंच घेतले पाहिजत हें कोणाही समंजस मनुष्यास सांगण्याचे कारण नाहीं. पण या अतिशयोक्तीच्या मुळाशी खच्या राष्ट्रीय भावनेचे बीज आहे हें कोणासही नाकबूल करितां यावयाचे नाहीं. हिंदुस्थानांत ब्राह्मणेतरांतील सर्वोत मोठा वर्ग म्हटला म्हणजे तो मुसलमानांचा. पण या वर्गासंबंधानें सर्वसंमत अशी तडजोड लखनौस होऊन ती राष्ट्रीय सभेच्या स्वराज्ययोजर्नेत नमूदही झाली आहे हे ज्यास माहीत आहे, तो हिंदूंचे मुसलमानांच्या हक्कसंरक्षणाविषयीं खरें धोरण काय आहे याविषयीं साशंक राहूं शकणार नाहीं; व मुसलमानासंबंधानें सर्व हिंदूंचे जें धोरण तेच तत्त्वतः ब्राह्मणाचे ब्राह्मणेतरांविषयीहि असणार हें उघड आहे. त्यांत बदल होण्याचे काय कारण ? पण या बाबतीत आम्ही मुख्य हरकत घेतों ती येवढ्यापुरतीच कीं, प्रत्येक जातीनें आपापलें हित दक्षतेर्ने पाहणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणें जरूर असले तरी अखिल हिंदी जनतेचा * ब्राह्मण व ब्राह्मणेतर ’ असा स्थूल विभाग करून जें केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यांत येत आहे तें दुष्ट बुद्धीचे आहे. कायदेकौन्सिलांतील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणांसच असाव्या असा हक्क ब्राह्मणांनीं पूर्वी केव्हाही सांगितलेला नाहीं व पुढेही सागू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारांत लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या तर तें त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्याच्या शिक्षणाचे फळ आहे ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणें होय. ब्राह्मणांनीं पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतांत मुद्दाम मार्गे टाकले किंवा दडपून ठेवलें हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. चातुर्वण्र्याची तात्त्विक पद्धति सर्वस्वी प्रत्यक्ष अमलांत पूर्वी केव्हां तरी होती किंवा नाहीं याविषयीं शंकाच आहे; व ती असली आणि अध्यापन, याजन व प्रतिग्रह हे अधिकार ब्राह्मणांप्रमाणेच इतर वर्णाना नसले तरी त्यांची व्याप्ति फारच संकुचित होती. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता हीं क्षत्रिय व वैश्य यांनाच काय पण शूद्रांनाही खुलीं होतीं. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, ६८