पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/555

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३८ लो० टिळकांचे केसरींतील लेख. तील निरनिराळ्या जातींच्या उत्कर्षाचा अंतर्भाव होतोच, नाहीं असें नाहीं. पण एकाद्या विशिष्ट किंवा मर्यादित वर्गाच्या कल्याणाकरिता आपला सर्व वेळ घालविण्यापेक्षा सर्व देशाच्या कल्याणाला झटावे असें जे उज्ज्वल देशभक्तीचे लक्षण ते सर फेरोजशहा याच्या अंगात पूर्णपणें बाणलेले असल्यामुळे त्याचे कोणतेही सार्वजनिक भाषण अगर कृत्य घेतल्यास त्यात या उदात्त देशभक्तीच्या तत्त्वाची झांक आढळून येत असे. फेरोजशहा हे उत्तम विद्वान् , इतिहासज्ञ, कायदपंडित आणि धोरणी होते याबद्दल तिळमात्र शंका नाही; परंतु हे कांहीं त्याच्या अंगचे विशिष्ट गुण होते असे म्हणतां येत नाही. कै. तेलंग किंवा मरहूम जस्टिस बदुद्दिन वगैरे फेरोजशहाप्रमाणेच विद्वान कायदेपंडित व पाश्चात्य विद्यालंकृत थेार माणसे मुंबईत झाली नाहीत असें नाहीं. तसेंच कै. न्या. रानडे याच्यासारखीं दिवसरात्र देशहिताच्या चिंतनांत आपला वेळ घालविणारीं माणसेही आमच्यात झालेली आहेत, आणि ज्यांनी आपले तनमनधन देशास सर्वस्वी वाहिलेले आहे असें आपले प. पू दादाभाई नवरोजी अद्यापही आमच्या सुदैवाने विद्यमान आहेत. सरफेरोजशहा मेथा यांची परीक्षा केवळ याच गुणावरून जर करावयाची असेल तर त्याच्या ठिकाणीं लोकाची जी एक विशेष प्रकारची आदरबुद्धि होती तिची उपपात लागणार नाहीं. फेरोजशहाचे नाव उच्चारल्याबरोबर जी भावना लीकाच्या मनांत उत्पन्न होते ती कांहीं नुसत्या विद्वतची, उद्योगाची किंवा सदैव कळकळीचीही नव्हे. पुढारी मनुष्याच्या अॅगात हे गुण पाहिजेत हे खरे आहे. पण ज्याला नित्य व्यवहारात लोकांचे नायकत्व पत्करून त्यांच्यातर्फे काहीं कामगिरी बजावावयाची आहे-आणि तीही केवळ गोडीगुलाबीनेच नव्हे तर प्रतिपक्षावर आपली छाप ठेवून बजावावयाची आहे त्याला वरील बुद्धिगम्य गुणाखेरीज धैर्यादि मानसिक गुणांचीही अपेक्षा असते. अशा प्रकारचे गुण मागच्या पिढीत कै. मंडलीक यांच्या अॅगीं होते. आणि तेच गुण काहीं बाबतींत उत्कर्षानेंही सर फेरोजशहा यांच्या अॅगीं वसत होते हें निर्विवाद आहे. किंबहुना ज्या ठिकाणीं आपली छाप पडून वर्चस्व राहाणार नाहीं तेथे हजर २ाहाण्याचीही अपेक्षा फेरोजशहा ठेवीत नसत ! इतकंच नव्हे तर आपल्या चेहयाची उग्रताही ते मोठ्या काळजीनें कायम ठेवीत, सर फेरोजशहा यास मुबईचा पंडित असे न म्हणतां मुंबईचा वाघ किंवा सिंह असे जे नाव मिळाले होते याचे कारण हेंच होय, व त्याचमुळे फेरोजशहांनीं एखादी सार्वजनिक गोष्ट हातात घेतली म्हणजे ती सेद्धीस नेण्यास जें धैर्य किंवा दीर्घ परिश्रम लागतात त्यात काही कमी होणार नाहीं असा सर्व लोकांस भरंवसा वाटत असे. सर्वच प्रकारचे सार्वजनिक प्रश्न फेरोजशहा हातांत घेत असत असें नाहीं. बॅरिस्टरीचा भरभराटीस आलेला धंदा संभाळून सर्वच सार्वजनिक प्रश्नांत लक्ष घालणेही त्यास शक्य नव्हतें. पण एखाद्या प्रश्नाचा नीट विचार करून त्याचा अमुक रीतीनें पुस्कार केला पाहिजे असे एकदा सर फेरोजशहा मेथा यांनी ठरविलें