पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/554

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर फेरोजशहा मेथा यांचा मृत्यु ५९३७ होऊन त्यांच्या मृत्यूनें मुंबई शहरावरच नव्हे तर मुंबई इलाखा व हिंदुस्थान यावरही दुःखाचा डोंगर केोसळल्यासारखें झाले आहे. आधीच आमचा हिंदुस्थान देश म्हटला म्हणजे बोलून चालून दुबळा. या देशात ब्यूरॉक्रसीच्या म्हणजे इंग्रजी अधिकारी वर्गाच्या करड्या सत्तेखालीं विद्येबरोबरच स्वातव्य, निर्भयता, करारीपणा वगैरे पुढायांच्या अंगीं अवश्य लागणा-या सणसणींत गुणाची वाढ प्रायः फारशी होत नसत. पण सुदैवानें हे गुण सर फिरोजशहा मेथा याच्या अगों वास करीत असल्यामुळे त्याच्या मृत्यूने देशाचे अगणित नुकसान झाल आहे असे आज प्रत्येकास वाटत आहे. सर फेरोजशहा याचे गेल्या ४५ वर्षाचे वर्तन, अनेक आणीबाणीच्या प्रसगीं त्यांनी काढलेले वक्तृत्वपरिपूर्ण व निर्धाराचे उद्गार, त्याचा मानी स्वभाव, वाघासारखी भव्य व उग्र मूर्ति, खडा व खणखणीत आवाज, भाषणांतील निरुत्तर आणि प्रतिपक्षास चीत करणारा निर्भय कोटिक्रम ज्याने प्रत्यक्ष अनुभविला आहे त्यांस आमच्या म्हणण्याची सत्यता ताबडतोब दिसून येईल. पण ज्यांनी या गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या नसतील-आणि मुबई इलाख्यांतील किंवा हिंदुस्थानातील सुक्षिक्षित वर्गात असे फारच थोडे लोक आढळतील- त्यास देखील मुंबईच्या या पुरुष--सिंहाचे निधन ऐकून अत्यंत विषाद वाटल्याखेरीज राहणार नाहीं. कारण मुंबईच्या म्युनिसिपालिटींत, कायदकैसिलात, युनिव्हर्सिटींत, हिंदुस्थानसरकारच्या कायदेकौंसिलात, अगर इल्बर्ट बिल, लंडरेव्हिन्यू बिल, पोलेस बिल वगैर सार्वजनिक चळवळीचे गेल्या ४५ वर्षात जे अनेक प्रसंग आले त्या त्या वेळीं सर फेरोजशहा मेथा यानीं जीं धाढसाची पण मुद्देसूद भाषणे अगर कामगिरी केली ती निदान वर्तमानपत्रद्वारा तरी सर्वास माहीत झालेली आहे आणि या कामगिरीवरून सर फेरोजशहा याची योग्यता, अधिकार, विद्वत्ता, निस्पृहपणा आणि हातीं घेतलेले काम तडीस नेण्याबद्दलचा निर्धार सर्वास कळून चुकला असून त्यांच्याबद्दल सर्व लोकाची अढळ पूज्यबुद्धि झालेली आहे. थेोडक्यांत सांगावयाचे असल्यास आमच्या पुढाच्यापैकीं फेरोजशहा हे एक लोकोत्तर मानी पुढारी होते, आणि गेल्या ४५ वर्षीत त्याचा हा मानीपणा एकसारखा कसोटीस लागला असल्यामुळे देशातील इतर पुढच्यावरही त्यांची छाप-किंबहुना दराराही म्हणण्यास हरकत नाहीं-बसलली होती. जातीने हे पारशी होते, आणि पाशीं लोक म्हटले म्हणजे प्राय: फारच झाले तर आपल्या जातीच्या उत्कर्षाच्या उद्योगांतच गढलेले असावयाचे. त्याची लोकसंख्या थोडी असली तरी विद्येचे आणि पैशाचे बल त्या जातींत पुष्कळ आहे. पण स्वदेश सोडावयास लागल्यावर ज्या हिंदुस्थानानें पार्शी लोकांस आश्रय दिला त्या देशाची भरभराट किंवा उत्कर्ष व्हावा म्हणून अश्रांत खटपट करणार पाशीं लोकात दादाभाई नवरोजीसारखे फारच थोडे गृहस्थ निघतात, आणि या थोड्यापैकीं सर फेरोजशहा हे एक होते. तथापि पाशीं जातीच्या उत्कर्षाकडे ते अगदींच लक्ष देत नसत असेही नाहीं. एकंदर देशाच्या उत्कर्षात हिंदुस्थाना