पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/556

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर फेरोजशहा यांचा मृत्यु ५३९ म्हणजे मग तत्सिद्धयर्थ लागणारा प्रयत्न अगर युक्तिवाद करण्यांत प्रमादानेंही यत्किचित डळमळीतपणा फेरोजशद्दांच्या वर्तनांत दिसून येत नसे; आणि त्यांच्या नायकत्वाबद्दल हिंदुस्थानांतील सर्व भागांत त्याची जी कीर्ति झाली आहे त्यांतील खरे बीजही हेच होय. प्रतिपक्षाचे स्वरूप विशेषत: इंग्रजी अधिकारी वगीच्या अरेरावी वर्तनाचे स्वरूप त्यांच्या पूर्ण लक्षात येऊन हें स्वरूप केव्हा ना केव्हां तरी पालटलें पाहिजे असें त्याचे ठाम मत झाले होतें. परंतु एखादा विशिष्ट सार्वजनिक प्रश्न जेव्हा उपस्थित होईल तेव्हा या मोठ्या प्रश्नाकडे लक्ष न देतां तत्कालीन सिद्ध होण्याजोगी गोष्ट केोणती हे लक्षात आणूनच तत्सिद्धयर्थ लागणाच्या प्रयत्नाची ते दिशा ठरवीत; आणि ही त्याची दिशा ठरली म्हणजे मग त्या दिशेपासून त्यास परावृत करण्यास प्रतिपक्षाने कितीही प्रयत्न केला तरी सर फेरोजशहा त्याची पर्वा ठेवीत नसत, किंवा कायद्याच्या अगर नियमाच्या आपल्या अपूर्व ज्ञानानें तो हाणून पाडण्यासाठी यत्किचितही डगमगत नसत. कायदेकौन्सिलांत, म्युनिसिपालिटींत अगर युनिव्हर्सिटींत वर निर्दिष्ट केलेल्या मर्यादेतही त्यांच्या मनाप्रमाणे सदासर्वदा गोष्टी घडत असत असे नाहीं. तथापि अशा प्रसंगीं त्याच्या प्रतिपक्षासही त्याच्या निभैयतेचे कौतुक वाटे, आणि त्यांच्या उद्देशाबद्दल शंका येत नसे. किंबहुना त्याची राहणीच अशी होती की, त्यांनीं कोणत्याही सरकारी कृत्यास विरोध केला तरीही तो काहीं भलत्या उद्देशानें केला असेल असें गोच्या अधिकाच्यासही वाटत नसे. सर फेरोजशहा यांच्याबद्दची अधिका-यांनी ही आदरबुद्धि लॉर्ड सिडन हॅम याच्या कारकीर्दीत कमी झाली होती, आणि तत्पूर्वी मुंबई म्युनिसिपालिटीत याचे एकमुखी वर्चस्व कमी व्हावें म्हणूनही त्याच्या निवडणुकीच्या वेळीं मुंबईचे अकॉटंट जनरल मि. हॅरिसन यानीं मनस्वी खटपट केली होती. फेरोजशहा झाले म्हणून काय झालें ? म्युनिपालिटीत त्याच्याच तंत्राने सर्व व्यवहार चालावा ही गोष्ट अधिकारी वर्गास कशी खपणार ? परंतु या चळवळीस अखेर यश आले नाहीं याची वाचकास आठवण असेलच. अधिकाच्याविरुद्ध चळवळ करणारा मनुष्य मोठा धोरणी पारशी विद्वान् असला तरी देखील तो त्यांच्या डोळ्यात सलती हें यावरून व्यक्त होतें. तथापि एकंदरीत पाहिले तर प्रथम सी. आय. ई. व नंतर १९०४ सालीं सर हा किताब मिळून हल्लींच्या गव्हर्नरच्या कारकीर्दीत अखेरीस फेरोजशहा यांस युनिव्हर्सिटचेि व्हाईस चेन्सेलरही निवण्यात आले. यावरून अंमलदाराचा आदर कायम ठेवून लोकाच्या हक्कासाठी भाडण्याचा जो मार्ग फेरोजशहा यानीं आपणासाठी आखला होता त्यात त्यास बरेच यश आले असें म्हणण्यास हरकत नाहीं. हाच मार्ग सर्वोस अशा तन्हेने साधेल असें काही म्हणता येत नाहीं, आणि कायदेकौन्सिलातल्या किंवा युनिव्हर्सिटीच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या व्यवहाराखेरीज इतरत्र त्यापासून कितपत फायदा होईल याबद्दलही मतभेद असण्याचा संभव आहे; पण तो प्रस्तुतचा विषय नाही. ज्या गुणांमुळे फेरोजशहा यांना लोकनायकत्व प्राप्त