पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/508

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. मुळे महाराष्ट्र भाषस बरेंच स्थैर्य आले होतें खरे; पण पुढे लवकरच महाराष्ट्रांत मुसलमानी राज्याची स्थापना झाल्यामुळे राजकीय व्यवहार बहुतेक परकी भाषेत चालू लागला. विद्वान् लोकांची स्थिती पाहावी तर त्यांनी आपलें सर्व ज्ञान प्राचीन पद्धतीप्रमाणें प्रायः संस्कृतातूनच संपादन केलेलें असावयाचे. आणि ज्या थोड्या हिंदु लोकाच्या हातांत राजकीय अधिकार राहिलेला होता त्यास मुसलमानी भाषेचा अधिक अभ्यास करावा लागत असल्यामुळे स्वाभाविकरीत्याच स्वभाषेच्या उत्कर्षाचे काम त्याच्या हातून होत नव्हते, अशा स्थितीत ज्ञानेश्वरापूर्वी व तत्कालीं स्वराज्याच्या छत्राखालीं वाढलेल्या मराठी भाषेचा बहुतेक नष्टांशच व्हावयाचा; किंवा निदान तिचे इतकें मोठे रूपातर व्हावयाचें कीं, ज्ञानेश्वरापूर्वीच्या भाषेची ही कन्या आहे हें ओळखूसुद्धा येऊं नये. मुसलमानी अमदानींत मराठी भाषेचे स्वरूप पालटून बरेच मुसलमानी शब्द व मुसलमानी भाषापद्धति मराठीत शिरली, हे आता काही निराळे सिद्ध करपयास नको. बखरीच्या भाषा आणि शिवाजी महाराजानीं तयार करविलला राज्यव्यवहारकोश याची साक्ष देत आहे. वास्तविक म्हटले म्हणजे हा काल मराठी भाषेच्या व्हासाचा होय; परंतु परमेश्वराच्या कृपेर्ने अशा आपत्कालातही मराठी भाषेला पूर्वीच्या स्वराज्यात पोसलेला वृक्ष वाढत जाण्यास एक दोन कारणें घडून आलीं. मुसलमानी राज्यात धमींच्या बाबतीत हिंदूंचा पुष्कळ छल झाला ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. महाराष्ट्र देशासंबंधानें विचार करताना हाच सिद्धान्त लक्षात ठेवला पाहिजे. दक्षिणेत आज जे मुसलमान लोक आहेत ते प्राय: अस्सल पठाण, मोंगल किंवा तुर्क नसून मुसलमानी अमदानीच्या पूर्वी या प्रातात ज हिदु लोक होते त्याच्यापैकी ज्यानी लोभार्ने किंवा सक्तीने मुसलमानी धर्म स्वीकारिला त्याचे वंशज आहेत हेही सांगावयास नकी, दक्षिणेतील मुसलमान आणि दक्षिणेतील मराठे यांच्या अंगात एकच रक्त वाहत आहे; आणि काही कारणानें धर्म भिन्न झाला असला तरी पिडार्ने ते एकमेकाचे बंधुच होत. असो; सागावयाची गोष्ट ही कीं, मुसलमानी अमदानीत जरी हिंदूंचा छल होत असला तरी त्या छलामुळेच हिंदु लोकाची आपल्या धर्मावरील श्रद्धा दुणावली गेली, असे म्हणण्यास हरकत नाहीं. हिंदु धमचिा छल होऊन मुसलमान धर्माचे प्राबल्य जेव्हा झालें तेव्हा * शिव शिव न हिंदुर्न यवनः ’ अशा प्रकारची काही लोकाची स्थिति झाली असल्यास त्यात कांहीं नवल नाहीं. जागीजागी देवालये मोडून उभारलेल्या भव्य व टोलेजेंग मशिदी आणि तेथे जमणा-या मोठमोठ्या उमरावाचा समुदाय याचा देशातील लोकांच्या मनावर धार्मिकरीत्या वाईट परिणाम झाल्याखेरीज राहावयाचा नाहीं. पण मुसलमानी धमैच्छलीमध्ये आमच्या दृष्टीनें एक मोठा गुण होता, तो हा कीं, हा छल बहुतेक किंवा सर्वाशीं शारीरिक जबरीचा होता. कुराणाचा स्वीकार कर, नाहीपेक्षां वतन बुडवित किंवा ठार मारतों असे याचे स्वरूप होतें. त्यामुळे अशा प्रकारचा छल सोसण्याचे