पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/509

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९२ ली० टिळकांचे केसरींतील लेख. ज्यांच्या अंगीं धैर्य होतें त्यांची स्वधर्मावरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. हल्लींच्या राज्यांत पाश्चिमात्य शिक्षणाच्या योगाने सुशिक्षित वर्गाच्या अंत:करणातील धर्मबीजच निर्बल होऊन गोमास भक्षणापर्यंत जशी कित्येकाची मजल येऊन ठेपली आहे, तसा मुसलमानी अमदानतिला प्रकार नव्हता. सक्तीच्या छलास जे बळी पडले त्याखेरीज बाकीच्यांच्या अंत:करणातील श्रद्धा छलाच्या धक्कयार्ने प्रतिकार करण्यास अधिक समर्थ झाली;आणि याचा परिणाम असा घडला की,त्यांनी आपलें धार्मिक मनोविकार आपल्या समाजास कळविण्याकरिता स्वभाषेचा अधिकाधिक उपयेोग करून तिची वाढ कायम ठेविली. मराठी भाषेचे हल्ली उपलब्ध असलेले वाङ्मय प्रायः धार्मिक का, याचा अशा रीतीनें नीट खुलासा लागते. जितका जितका छळ अधिक तितकी प्रतिकार करण्याची इच्छाही अधिक. किंबहुना गतिशास्रात ज्याप्रमाणें क्रियेने प्रतिक्रिया उत्पन्न होते असा सिद्धात आहे तसाच धार्मिक बाबतीतही सिद्धात बनवितां येईल. ज्ञानेश्वरापासून रामदासापर्यंत झालेल्या संत मंडळींची भाषेच्यासंबंधाने कामगिरी पाहताना तत्कालीन राजकीय परिस्थितीचा वर सागितल्याप्रमाणे अवश्य विचार केला पाहिजे. राजसत्ता परधर्मीं लोकांच्या हातात असल्यानें या परकीय लोकाच्या भाषेतच बहुतेक राजकीय व सामाजिक व्यवहार चालत असत; आणि न्याय, व्याकरण आदिकरून पाडित्याचे व्यवहार संस्कृत भाषेत चालत. अशा परिस्थितींत धर्माची बाब जर संत मंडळीनें हातांत घेतली नसती तर मराठी भाषेत ज्ञानेश्वरी हा पहिला आणि शेवटचाच ग्रंथ झाला असता. धर्माची बाब त्या वेळीं लोकाच्या पुढायानीं हातात घेण्यास दुसरेही एक कारण झालें होतें. इसवी सनाच्या सातव्या शतकात जैन व बौद्ध धर्माचे खडण करून हिंदुस्थानात व हिंदुस्थानाबरोबर महाराष्ट्रातही शकराचार्यानी जरी वैदिक धर्माची स्थापना केली तरी पुढे काहीं वर्षेपर्यंत तो धर्म थेोडाबहुत चालतच होता. कुमारिलाचा श्रौतमार्ग सर्व जातीच्या लेोकानीं आचरणें निषिद्ध होतें, आणि आचार्याचा वेदातमार्ग पंडिताखेरीज इतरास अगम्य होता, तेव्हां जैन आणि बौद्ध यांचा आचार्यानीं जरी पराभव केला तरी था धमीच्या अभावीं सामान्य जनसमूहास केोणता धर्म आचरण्यास सांगावे हा एक त्या वेळच्या धार्मिक विद्वानापुढे मोठाच प्रश्न होता; आणि मुसलमानी अमदानीपूर्वी जर त्याचा योग्य निकाल लावला नसतां तर जैन आणि बौद्ध धर्माच्या ऐवजी मुसलमानी धर्म या प्रातांत एकदम प्रचलित झाला असता. भाक्तमागै किवा भागवत धर्म याच्या प्रवर्तकांनी देशावरील संकट टाळलें हें आम्हीं नेहमीं लक्षांत ठेवले पाहिजे. याप्रमाणें हिंदुस्थानातील धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेंही भाक्तमार्गास या कालीं विशेष महत्त्व आले होतें; आणि मुसलमानी धर्मच्छलाचे स्वरूप केवळ शारीरिकशक्तीचे असल्यामुळे महाराष्ट्रांत या धर्माच्या वाढीस मुसलमानी अमदानींत एक प्रकारचे साहाय्यच झालें असे म्हटले पाहिजे. परकीय अमलात राजकीय महर्षि किंवा संत उत्पन्न होणें