पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/507

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९० लो० टिळकांचे केसरींतील लेख. कळविण्यास शब्दांची जरुरी आहे; आणि देशांतील व्यापार वाढला असतां ज्याप्रमाणे अधिक नाणे-मग तें धातूचे असो वा कागदी असो-उपयोगांत आणणें जरूर पडतें, त्याप्रमाणेच समाजात एकमेकांच्या विचारांचे दळणवळण वाढविण्यास शब्दाची जरुरी लागते. जगांतील सर्व मनुष्याची भाषा जर एक असती तर मनुष्यजातींपैकी एका भागाची सुधारणा झाल्यानें सर्व भाषेची एकदम सुधारणा झाली असती. पण आजपर्यंतच्या इतिहासाच्या अनुभवावरून असा नियम दिसून येतो कीं, धर्म व भाषा या दोन्ही गोष्टी सर्व जगभर एकरूपार्ने कधीही असू शकत नाहीत; व मानवजातीच्या प्रारंभकाली त्या एक हीत्या असें जरी मानलें, किंवा आजमितीस यक्षिणीची काडी फिरवून त्या सर्व जगभर जरी एक करता आल्या तरी कालांतरानें या दोन्ही गोष्ठीस देशभेदानें भिन्न भिन्न स्वरूप प्राप्त व्हावयाचेच. किंबहुना एकराष्ट्रीयत्वाचे एकभाषा व एकधर्म, अर्थात् भिन्न राष्ट्रीयत्वाचे भिन्न भिन्न भाषा व भिन्न धर्म हें एक प्रधान लक्षणच होऊन बसलें आहे. हें असें कां व्हावें, भाषावैषम्य किंवा भापाभेद आणि धर्मभेद हे नाहींसे करणे अशक्य आहे की काय, या प्रश्नाचा आज विचार कर्तव्य नाही. वस्तुस्थिति कशी आहे आणि ती किती प्राचीन कालापासून चालत आली आहे, एवढेच आपणांस पाहावयाचे आहे; आणि तशा दृष्टीनें विचार केला म्हणजे विवक्षित मनुष्यसमाज आणि त्या समाजातील व्यक्तिमात्रानीं आपापले विचार एकमेकास कळविण्याकरितां योजलेलें शाब्दिक साधन किंवा भाषा यांचा संबंध नित्य आहे असें मानूनच कोणत्याही विशिष्ट भाषेच्या अभिवृद्धीची अथवा -हासाची मीमासा केली पाहिजे हें उघड आहे. महाराष्ट्रभाषेच्या अभिवृद्धीचा अशा रीतीनें विचार केला म्हणजे अनेक गोष्टी डोळ्यापुढे उभ्या राहातात. नर्मदेच्या दक्षिणेस आणि घटप्रभच्या उत्तरेस महाराष्ट्रभाषेचा प्रारंभ सुमारें इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकांत झाला असें प्राचीन लेखाच्या शेोधकांचे मत आहे. त्यापूर्वी या प्रातातील भाषा कानडी होती. परंतु या समयास नर्मदेच्या उत्तरेकडून आर्य लोकाचे जे संघ दक्षिणेंत आले त्यांनी दाक्षणेतील लोकाशीं बरोबरीनें वागून व त्याच्यांत मिळूनमिसळून आपली प्राकृत भाषा या प्रदेशात आणली आणि त्या प्राकृत भाषेत जुन्या भाषाशीं मिश्रण होऊन त्यापासून हल्लीची महाराष्ट्र भाषा उत्पन्न झाली. यानतर काहीं शतके ती बाल्यावस्थेतच होती. पण पुढे यादव राजांचा तिला आश्रय मिळून नर्मदेच्या दक्षिणेस तिचा पगडा उत्तरोत्तर आधिकाधिक बसत चालला; आणि प्रांतांतील सर्व व्यवहार त्याच भाषेत चालू लागल्यानें लवकरच पुढे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ नेिमाण झाले. मराठी भाषेच्या उगमाचा अद्याप जरी पुरा शोध लागला नाही तरी उपलब्ध असलेल्या माहितीवरून वर दिलेले सामान्य विधान करण्यास कांही हरकत नाही. या वेळची महाराष्ट्रदेशाची स्थिती फार चमत्कारिक होती. यादव राजांनीं प्रोत्साहन दिल्या