पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/456

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंहॉभारतं. 998 झालें तीं वेगळी कशीं काढावीं एवढाच काय तो मुख्य प्रश्न आहे; आणि या प्रश्नाचे रा. वैद्य यांनीं जें उत्तर दिले आहे त्यांतील तत्त्व सर्वास पसंत पडण्यासारखें आहे. ते असे म्हणतात कीं, * ज्या ज्या ठिकाणीं आख्यानाची द्विरुक्ती झाली आहे, उदाहरणार्थ, आदिपर्वोतील कश्यप आणि ययाति यांचे आख्यान, किंवा जेथे लांबलचक गोष्टी किंवा आख्यानें विशेषसा संबंध नसतां सांगितलीं गेली आहेत, उदाहरणार्थ वनपवीतील रामोपाख्यान किंवा गदापवीतील सरस्वती आख्यान, तेथे तीं ती आख्यानें मागून घातली आहेत असें अनुमान करण्यास जागा आहे. जयनामक भारतांत पहिल्याने जरी पांडवांच्या विनयाचीच कथा होती तरी मागाहून इतिहास, धर्म, नीति, पुराण, आचार, इत्यादिकांचा संग्रह भारतांत केल्यास चांगलें अशी जेव्हा बुद्धि उत्पन्न झाली तेव्हा निरनिराळीं उपाख्यानें त्यास जेोडून त्यास महाभारताचे स्वरूप आणलें असावें असें चिंतामणराव वैद्य याचे म्हणणे आहे. पूर्वीच्या पौराणिक कथा, भूगोलादि व्यावहारिक ज्ञान, धर्माचे रहस्य, कथानकाची द्विरुक्ति करून त्यास वैचित्र्य आणणें, यक्षप्रश्नासारखीं किंवा अनुगीतेसारखी चागल्या प्रकरणाचीं अनुकरणात्मक आख्यानें करण्याची इच्छा, अथवा कोठे कोठे पुढील कथचा बीजरूपानें उल्लेख आणि ठिकठिकाणीं जास्त खुलासा करण्याची बुद्धि या कारणामुळे महाभारतास सर्वसंग्रहाचे स्वरूप आले आहे असे रा. ब. वैद्य यानीं प्रतिपादन केले आहे. त्यांनीं मागूनचीं म्हणून जीं आख्याने चवथ्या परिशिष्टांत दिली आहेत त्यांपैकीं काहीं मागूनचीं आहेत कीं नाहींत याबद्दल मतभेद होऊं शकेल; कारण ही सर्व अनुमानाची गोष्ट आहे. तथापि भारताचे पुढे महाभारत झाले असे मानल्यानंतर अशा प्रकारची काहीं व्यवस्था मानणे जरूर आहे आणि त्या व्यवस्थेचीं जीं तत्त्वें रा. ब. वैद्य यानीं दिली आहेत तीं सवांस मान्य होण्यासारखीं आहेत. या प्रकरणासंबंधाने शेवटचा मुद्दा असा आहे कीं, भारताचे महाभारत करताना जीं हीं प्रकरणें मागून घातलीं ती केव्हा घातली ? ऐतिहासिक दृष्टया हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अलेक्झाडरच्या वेळीं चंद्रगुप्ताच्या दरबारी असलेल्या मेग्यास्थेनीस नावाच्या ग्रीक वकिलानें हिंदुस्थानचा जो वृत्तान्त लिहिला आहे त्यात महाभारताचे नांव नाहीं, म्हणून त्याच्या कालापूर्वी (खिस्ती शकामागील सुमारे तीनशें वर्षाच्यापूर्वी ) महाभारत नव्हतें असें कित्येक युरोपियनाचे म्हणणे आहे. परंतु हें म्हणणें गैरशिस्त आहे. कारण एक तर मेग्यास्थेनीसचा समग्र ग्रंथ इल्लीं उपलब्ध नाहीं; आणि दुसरें त्यानें मथुरच्या कृष्णाची गोष्ट सांगितली आहे. शिवाय मेग्यास्थेनसिसारख्या परकीयानें एखादी गोष्ट सांगितली नाहीं एवढ्यावरून ती त्याच्या काळांत हिंदुस्थानात नव्हती असें अनुमान करणें अगदीं चुकीचे आहे. मेग्यास्थेनीसर्ने सागितलेल्या कांहीं गोष्टी इतक्या अविश्वसनीय आहेत कीं, हा एक * लुच्चा ’ ग्रंथकार असावा ५५