पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/457

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

99 R लो० टिळकांचे केसरींतील लेख. असें स्ट्राबोनें म्हटले आहे. मेग्यास्थनीस सोडून दिला तरी खिस्ती शतकाच्या पहिल्या शतकांत झालेला डायॉसन खायसोस्तोम यानें हिंदुस्थानात होमरचे भाषांतर झालेले आहे असे लिहिलें आहे आणि अलेक्झांडरचे वर्णन देतांना प्लटार्कनेही हीच गोष्ट सागितली आहे. यावरून एक लक्षात्मक भारत किंवा रामायण अलेक्झांडरच्या वेळी प्रचारात असार्वे असें दिसते. महाभारतांत राशींचा किंवा वारांचा उल्लेख नाहीं, आणि गौतमबुद्धाची अवतारांत गणना केली नाहीं, यावरूनही हेंच अनुमान दृढ होतें. उलट पक्षीं पौष्यपर्वात नग्नक्षपणकाचा (जैन) उल्लेख आहे आणि नक्षत्रांची गणना विश्वामित्राने * प्रतिश्रवण पूर्वाणि नक्षत्राणि चकार सः ? अशा रीतीनें केली, असे आदिपर्वात एकाहतराव्या अध्यायांत सांगितले आहे. यावरून खिस्ती शतकाच्यापूर्वी चारशें किंवा पांचशें वर्षापलीकडे एकलक्षात्मक महाभारताचा काल नेता येत नाहीं. वेदागज्योतिषात नक्षत्राची धनिष्ठादि गणना आहे; व संपातानें ती बदलून श्रवणादि होण्यास वेदाग ज्योतिषानंतर एक हजार वर्षे किंवा सुमारें खिस्तीशकापूर्वी चारशें पन्नास वर्षे हा काल येतो. या सर्व पुराव्यावरून भारत पूर्वीचे असले तरी हल्लींच्या महाभारत ग्रथास जें स्वरूप आले आहे तें त्यास खिस्ती शकापूर्वीच दुस-या किवा तिसच्या शतकात प्राप्त झाले असावें, नंतर नव्हे, असें रा. वैद्य यांनी अनुमान केलें आहे; व एकंदर पुराव्याचा विचार करता तेंच अनुमान बरोबर आहे असे आम्हांत वाटतें.

  • महाभारत,

नंबर ३. त्वय{च काव्यभित्युक्तं तस्मात्काव्यं भविष्यति । --अादि ० १ ८२. यश्चैनं शृणुयान्नित्यमाषैश्रद्धा समन्वितः । -आदि० १-२६७. राव ब. चिंतामणराव वैद्य यांच्या पुस्तकाच्या पूर्वाधांच्या सहाव्या भागांत महाभारताचे आर्ष-महाकाव्य या दृष्टीनें परीक्षण केलेले आहे. उपाख्यानें सोडून दिलीं, तरी काव्य या नात्यानेही नुसत्या महाभारताची योग्यता फार मोठी आहे; आणि रा. वैद्य यानी महाकाव्य या नात्यानें त्याचे जसें परीक्षण केले आहे, तसे पूर्वी कोणीही केलेले आमच्या पाहण्यात नाही. संस्कृतात साहित्य व अलंकारशास्रावर काव्यप्रकाश, काव्यादर्श, साहित्यदर्पण, रसगंगाधर इत्यादि अनेक ग्रंथ

  • ( केसरी, तारीख १८ एप्रिल १९०५).