पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 9. о लो० टिळकांचे केसरीतील लेख. पण तसे न धरतां तें सौतीच्या भारतास लागूं आहे असे मानले तर सौतीच्या आदिपर्वाचे कांहीं भाग निरनिराळ्या मताप्रमाणे सोडून द्यावे लागतात; कारण आस्तिकाच्या कथेस आदिपर्वाच्या तेराव्या अध्यायांत सुरवात होते, उपरिचराच्या कथेस त्रेसष्टाव्या अध्यायांत सुरवात होते; आणि मनूच्या वंशास पंचाहतर अध्यायापासून सुरवात होते. रा. वैद्य असे लिहितात कीं, * मनु ’ हें नांव अध्यायाच्या आरंभीं केोठे सांपडत नाहीं; व टीकाकारानें सांगितल्याप्रमाणे पहिल्या अध्यायांत * विवस्वत् ’ पद आले आहे तेंच मनुवाचक ध्यावें असें त्यांचे मत आहे. परंतु हें मत आम्हांस ग्राह्य नाहीं. कारण हल्लींच्या पहिल्या अध्यायापासूनच जर कित्येकांच्या मतें महाभारतास सुरवात असती तर * मन्वादि ’ ठीक त्याच अध्यायांत आला नसता.पंचाहतराव्या अध्यायाचा आरंभ * प्रजापतेस्तु दक्षस्य मनोवैवस्वतस्य च ’ असा आहे व तोच वर सांगितलेल्या मन्वादि पदानें अभिप्रेत आहे असें आम्हांस वाटतें. आदिपर्वाच्या अनुक्रमणिकंत“पांडुर्जित्वा बहून् देशान् असा भारताचा उपक्रम केला आहे, त्यावरून मूळ भारतास एकशें बारा अध्ययानंतर सुरवात झाली असावी असेंही कित्येकांचे मत आहे. तसेंच पहिले तीन अध्याय सोडून चवथ्या अध्ययाचा आरंभही ग्रंथारंभासारखा आहे. याप्रमाणें पाहिलें म्हणजे कांहींकांच्या मतें पौष्य आणि पौलोम पर्व आणि काहींकाच्या मतें आस्तीक, शकुंतला आणि ययाति आख्यान ही भारतास मागून जोडलीं असावीत, अशीं मर्त सौतीच्या वेळीं प्रचलित होती असे दिसून येते. याच दृष्टीनें पाहूं गेले असतां चोवीस हजाराचे लक्ष भारत कसें झालें याचा पक्का नाही तरी अंदाजार्ने निर्णय करतां येण्यासारखा आहे. रा. वैद्य यानीं चैौथ्या परिशिष्टांत त्याच्यामतें जीं आख्याने महाभारतांत मागून घातलीं त्यांची यादी दिली आहे, व ती सौतीनें घातली असावी असे त्यांचे म्हणणे आहे. भारतास * जय ' असेंही नाव असून त्याचा आदिपर्वाच्या बासष्टाव्या अध्यायांत * जयेोनामेतिहासेोयं श्रेोतव्यो विजिगीषुणा ’ असा उल्लेख आहे. यावरून रा. वैद्य असें मानतात की, व्यासार्ने पांडवांचा विजय वर्णन केला म्हणून त्याचे ग्रंथास* जय ’, वैशंपायनाच्या ग्रंथास * महाभारत ? अशीं तीन निरनिराळीं नांवें पडली असावीत. व्यासाच्या ग्रंथाचे वैशंपायनानें एक व सौतीनें दुसरें अशीं दोन संस्करणें केली हें उघड आहे. पण व्यास, वैशंपायन व सौती या त्रयाँस प्रत्येकीं* जय ’, ‘ भारत ? आणि * महाभारत ? यांचे कर्तृत्व निरनिराळे देण्याइतका पुरावा आहे असें आम्हांस वाटत नाहीं. आश्वलायनाचा गुरु शौनक आणि सौतीनें भारतांत सांगितलेला शौनक जर एक मानिला तर आश्वलायनानें केलला महाभारताचा उल्लेख सौतीस लागूं करतां येईल. पण सौतीनें केलेलें महाभारताचे निरुक्त पहातां हें अनुमान करणें प्रशस्त दिसत नाहीं. असो; भारत आणि महाभारत असे दोन ग्रंथ असावे एवढे जर सिद्ध आहे तर यापेक्षां सध्यां जास्त खोल पाण्यांत जाण्यास नको. भारतास जीं आख्यानें जोडून महाभारत