पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/445

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ o लो० टिळकांचे केसरींतील लेख. आणि तेवीस यामधले कोणते तरी कायम करावे, असा जो ठराव झाला आहे, तो सयुक्तिक आणि अधिकमासासंबंधानें ऐक्यमत होण्यास उपयुक्त आहे. उजनीची मध्यरेखा घ्यावी, नक्षत्रे सत्तावीस आणि अठ्ठावीस (अभिजित् धरून) अशीं दोन्ही प्रकारें फलग्रथाकरिता दाखवावी, आणि तिथिमान केोणास पाहिजे तर स्थूल कसे करावें, हेंही नव्या करणग्रंथात सांगितलेले असावे, असे आणखी तीन ठराव या परिषदेंत झालेले आहेत. पण ते वरच्याहून कमी महत्त्वाचे आहेत. सायन-निरयन-वादासंबधाने परिपर्देत असा निर्णय झाला आहे कीं, हल्लींप्रमाणेच महिने निरयण धरावे, परंतु पंचागांत सायन आणि निरयण संक्रातीशास्रार्थाच्या सदराखालीं ध्यावा. निरयणानें ऋतु चुकतात आणि सायनवाद्याचा जो आक्षेप आहे त्याचाही या परिपर्देत विचार होऊन उत्तरायण व दक्षिणायन यांचे आरभसूर्य प्रत्यक्ष उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे वळेल तेव्हा लिहावें, असे ठरले आहे. यामुळे अयन बहान्तरवर्षानीं एकेक दिवस मार्गे येत जाईल; पण स्थिर नक्षत्रे सोडून देण्यापेक्षा ही पद्धत परपरागत असल्यामुळे आणि शास्त्रदृष्टयाही अधिक झाह्य होय. साराश, परिपदेनें जेो निर्णय केला आहे तो पुष्कळ अंशी केतकरांच्या चित्नापक्षास व कै. दीक्षित यांनी भारतीय ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात पंचांगशेोधन सदराखालीं जेो “ तिसरा पक्ष ” सागितला आहे, त्यास धरून आहे. बापूदेवशास्त्र्यांची सौर वर्पमानाची रीति घेतली आहे; पण त्यानी घेतलेल्या अयनगतीस वेधार्ने जरूर लागेल त्याप्रमाणें बीजसंस्कार घ्यावा, असें ठरविले आहे केरोपंती पक्षाचे अयनाश कबूल झाले नाहीत, पण ग्रहगतिमानें कबूल झाली आहेत. सूर्यसिद्धातांतली ग्रहगतिमाने मूलभूत धरली आहेत, पण आता तीं बीजसंस्कृत ध्यावी असें ठरविले आहे; आणि अथनाश पूर्वीच्या सिद्धातातील व करणग्रंथातीलच घेतले आहेत. सायनवाद्यांचे महिने घेतले नाहीत; पण अयन आणि ऋतु हे मार्गे मागे जातात ही गोष्ट कबूल केलेली आहे. तात्पर्य, परिषदेचा निर्णय कोणत्याही एका पक्षास जरी सर्वोशीं अनुकूल नसला तरी तो सर्वोनीं प्राजलबुद्धीनें स्वीकारण्यास हरकत नाहीं. या ठरावाप्रमाणे नवीन करणग्रंथ तयार होऊन सर्व हिंदुस्थानभर जर नवे पंचांग सुरूं झाले, तर आम्ही आज एक मोठी गोष्टच मिळविल्यासारखे होईल; आणि ही गोष्ट पदरांत पडल्यावर मग पाहिजे तर दुस-या काही गोष्टींचा विचार करितां येईल. यासाठी सर्वांस आमची अशी विनंति आहे की, त्यांनीं परिषदेचा ठराव अमलात आणण्यास आपल्या हातून होईल तितकें साहाय्य करावें.