पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/444

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशोधन. ? R& रा. रा. केतकर यानीं नवीन करणग्रंथ केलेला असल्यामुळे त्याची सही या ठरावावर नाही व घेणेही प्रशस्त नव्हतें. पण वरील सिध्दान्त, म्हणजे वेधार्ने उपलब्ध झालेलीं सूक्ष्म मानेंच घेतली पाहिजेत हा कॅतकी, केरोपंती, किंवा बापुदेवशास्त्री वगैरे सर्व पक्षास मान्य असला पाहिजे व आहे. परिषदेचे म्हणणें एवढेच आहे कीं, सूर्यसिध्दान्त सर्व मान्य असल्यामुळे प्राचीन पद्धतीप्रमाणें त्यातील ग्रहगतीची मानें आरंभी घेऊन त्यांस दृक्प्रत्ययाकरितां अवश्य लागेल तो बीजसंस्कार करून मग पंचाग तयार करावे. तात्पर्य, बापुदवशास्त्र, केरोपंत, रघुनाथाचार्य वगैरे आज किलेक वर्षे ज्याकरिता प्रयत्न करीत होते, तीच गोष्ट या परिपदेत मंजूर झालेली आहे, व याप्रमाणे जें पंचाग तयार होईल त्यांतील ग्रहणे, अस्तोदय, युति, तिथी वगैरे नेहमीं दृक्प्रत्ययास बरोबर येत जातील यात बिलकूल शका नाहीं, सूर्यसिध्दान्त मूलभूत घेतल्याकारणानें पंचाग तयार करण्याच्या रीती एरव्हीं जितक्या सोप्या करता आल्या असत्या तितक्या व्हावयाच्या नाहीत. पण पूर्वपरंपरा राखावयाची असल्यास केवळ सौकर्याकड लक्ष देऊन उपयोग नाही हे ध्यानात ठेविलें पाहिजे. परिषदेपुढे दुसरा मोठा प्रश्न म्हणजे अयनाशाचा होता. केरोपंती पंचागात अयनांश अठरा धरले आहेत; पण याखेरीज इतर पंचागांत ते बावीसतेवीसांच्या जवळ जवळ आहेत, अयनांश निराळे मानले म्हणजे अधिक महिन्यांत आणि संक्रातींत भद पडतो. बापूदेवशास्री व केरोपंत हे दोघेही सूक्ष्म गणितानेच पंचाग तयार करीत असतात. तथापि त्याच्या पंचांगातील अधिकमासांत जो भद पडतो त्याचे कारण त्यानीं मानलेले निरनिराळे अयनाश हें होय. सामान्य जनाच्या दृष्टीनें पाहिले म्हणजे निरानराळ्या पंचांगात निरनिराळे अधिक मान असणें हा गणिताचा मोठा दोष आहे असें समजतात. पण खरी स्थिति तशी नाहीं. हा भद गणितानें नव्हे तर अयनाश निरनिराळे मानल्यामुळे होत असतो. आणि तो टाळण्याकरिता सर्व हिंदुस्थानभर एक अयनाश मानणे हाच उपाय होय. आतां अयनाश अठरा मानार्वे किंवा वीस मानावें या प्रश्नाचा निकाल वादविवादाने होणें अशक्य आहे. प्रत्येक बाजूला निरनिराळी युक्ति आहे. बरें गणिताच्या मानाने पाहिले तर आरंभस्थान निश्चल असावें एवढेच काय तें जरूर आहे; मग तै दोन चार अंश मागें असो वा पुढे असो. कै. केरोपताचा कटाक्ष हें स्थान निश्वल मानण्याकडे जितका होता तितका अठराअंशाच्या अंतरावरच मानण्याकडे होता असे आम्हास वाटत नाही. त्यांच्या युक्तिवादानें अठराअंश सिद्ध होतात; पण “ ग्रहगतींचीं माने तुमच्याप्रमाणेच आम्ही शुद्ध घेतो, अयनाश मात्र सर्व हिंदुस्थानात प्रचलित आहेत त्याप्रमाणेच बावीसपासून तेवीसपर्यंत कोणते तरी सर्व हिंदुस्थानभर एकच कायमचे घेतों, ” असे जर कोणी केरोपंतास हटलें असतें तर त्यानीं ती गोष्ट नाकबूल केली असती असें आम्हांस वाटत Hाहीं. सारांश, मुंबईच्या परिषदेत आरंभस्थान निश्वल मानून अयनाश बावीस