पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंहाभारत. ४ ३१

  • महाभारत

धर्मे अर्थे च कामे च मोक्षं च भरतर्षभ । यदिह्ास्ति तदन्यत्र यत्रेह्ास्ति न तत् कचित् । देशातील थेोर प्राचीन ऐतिहासिक पुरुषाचे उदात्त चरित्र लोकास सागून त्यांच्या वंशजात शौर्य, अभिमान, सत्यनिष्ठा, धर्मबुद्धि वगैरे अनेक सद्गुण जागृत करणारे प्राचीन काव्य जेथे जेथे उपलब्ध आहे तेथे तेथे ते राष्ट्रीयत्वाचे प्रधान अंग मानले गेले आहे. होमरचे इलियड हे एक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्यें अशा प्रकारचे काव्य समजतात; परंतु खरं म्हटलें म्हणजे जुन्या ग्रीस देशातील लोकाना जी त्याची किंमत होती ती हल्लीच्या युरोपातील खिस्तधर्मीय राष्ट्रास राहिली नाही. जुन्या रेोमन लोकामध्येही इलियड हें काव्य ह्याच वर्गातलें मानीत असत. राष्ट्राचा अभ्युदय होण्यास अनेक कारणें लागतात हे निर्विवाद आहे. पण राष्ट्रांतील सर्व लोकास एकसमयावच्छेर्देकरून आनंद, ज्ञान, ईर्षा किंवा उत्साह देणारे प्राचीन महाकाव्यासारखें दुसरे साधन मिळणे कठिण आहे. अशा काव्यास इंग्रजीत * एपिक ? काव्य असे म्हणतात. * एपिंक ? या इंग्रजी शब्दाचे वीररस प्रधानकाव्य किंवा वीरकाव्य असे कित्येक भाषातर करतात, पण आमच्या मतें हे भाषातर बरोबर नाहीं. जुना सोप्रदाय पाहिला असता अशा प्रकारच्या ग्रंथास महाकाव्य अशीच संज्ञा दिलेली आहे; आणि कालिदासादिक कवीनीं केलेल्या काव्यांपासून त्याचा भद् दाखविण्याकरिता त्याच्यामागे * आर्ष ’ हें विशेषण लावलेलें आढळते. आर्ष महाकाव्यात कोणकोणते गुण असावे ह्याबद्दल पुढे विवेचन येईलच. सध्या एवढेच सागणें आहे कीं, इंग्रजीत ज्यास * एपिक ? काव्य म्हणतात त्याचा अर्थ संस्कृतांत अगर मराठीत * आर्ष-महाकाव्य ’ या शब्दांनींच चागला व्यक्त होतो; इतर्केच नव्हे तर ही सज्ञा प्राचीन असल्यामुळे रामायण किंवा महाभारत ही जीं आर्य लोकांचीं दोन मोठीं * एपिक ’ काव्ये आहेत त्यास ती अधिक अन्वर्थक रीतीने लागू पडते. खुद्द महाभारतात पहिल्या अध्यायांतच * यश्चैनं शृणुया नित्यं आर्षश्रद्धा समन्वितः ’ असा आर्ष या पदाने महाभारताचा उल्लेख केलेला आहे, व वाल्मीकीनेंही अशाच रीतीनें आपल्या काव्यास * आर्ष ? म्हटलें आहे. हरिवशात जथे महाभारताचे वर्णन आले आहे तेथेही * इदं महा काव्यं ऋर्षेर्महात्मन: ' अशीं पर्दे आहेत. यावरून आमच्या देशांतील महाभारत आणि रामायण ही जी दोन राष्ट्रीय महाकाव्ये यास पहिल्यापासून * आर्ष-महाकाव्य ’ म्हणण्याचा परिपाठ आहे असे दिसून येतें; व हाच परिपाठ कायम ठेवून * एपिक पोएम ? या इंग्रजी शब्दांकरितां * आर्ष-महाकाव्य ’ हा शब्द आम्ही या लेखांत वापरणार आहोत.

  • एपिक पोएट्टी ’ याअर्थी मराठीत किंवा संस्कृतात कोणचा शब्द

(केसरी, ता. १४ मार्च १९०५)