पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ १० लो० टिळकांचे केसरींतील लेख. काढणे शक्य नाहीं. तथापि * ढेपर ? * मांजर ' वगैरे कांहीं शब्द सानुस्वार उच्चार करण्याचे कांहीं कारण दिसत नाहीं. या व दुस-या कित्येक शब्दांवरील अनुस्वार नाहीसे झाल्यास त्यात भाषेची काहीं हानि नाही. केवळ एका विशिष्ट प्रान्तात सानुरुवार उच्चार होतेों एवढे कारण तो शब्द अनुस्वार देऊन लिहिण्यास बस्स नाहीं. व्युत्पत्तीही पाहिली पाहिजे. आतां व्युत्पत्ति पाहूं गेले असतां * पानीयं ? याचे * पाणी ’ हे रूप असल्यामुळे त्यावरही अनुस्वार द्यावा लागेल; असा एक आक्षप आहे पण त्यात कांहीं अर्थ नाहीं. शब्दावर आम्ही अनुस्वार देत नाहीं त्यावर व्युत्पत्तीच्या आधारानें तो लादणै अगदीं गैर होय. पण ज्या शब्दाचा उच्चार प्रातभदाने सानुस्वार व निरनुस्वार असा दोन्ही प्रकारचा होतो तेथे ज्यास व्युत्पत्तीचा आधार मिळेल किंवा शब्दभेद ओळखण्यास जेथे जरूर आहे तेथे मात्र अनुस्वार ठेवावा, बाकीच्या ठिकाणीं देऊं नये. येणेंप्रमाणें हल्लीं ज्याबद्दल वाद आहे किंवा क्रमिक पुस्तकांत जे नियम अमलांत आणण्याचा विचार आहे त्यासंबंधानें आमचे मत आहे. याने मराठी भाषेच्या लेखनात क्राति होऊन प्राचीन कवींचे ग्रंथ समजण्यास अडचण पडेल अशी जी कित्येकास भीति पडली आहे ती आमच्या मते निरर्थक आहे. सरकारी शाळाखात्यातील काहीं अधिका-यानीं आपल्या मताप्रमाणेच मराठी भाषेच्या शुद्धलेखनाची व्यवस्था लावावी, इतरास विचारण्याची जरूर नाहीं, असें जर कोiाचे म्हणणे असेल तर ते मात्र अाम्हास मान्य नाहीं. पण मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचे नियम ठरविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास व ती प्रयत्न शास्रीय असल्यास त्या मनुष्याने ही मोगलाई केली, असे मात्र आम्हांस वाटत नाही. अशा प्रकारचे नियम ठरून ते हळू हळू अमलात येत गेल्यानेंच भाषेच्या लेखनपद्धतीस स्थैर्य व सुगमता यावयाची आहे. तथापि वर सागितल्याप्रमाणे हे नियम आजच अगदी कडक रीतीनें अमलांत आणून भाषेवर जुलूम करावा, असें आमचे म्हणणें नाही. जी भाषा बोलण्यात नाहीं तिचे व्याकरण रचताना भाषेत अखेरीस जीं रूपै राहातात त्याबद्दलच वैयाकरणास विचार करावयाचा असतो. परंतु प्रचारांतील वाढत्या भाषेसंबंधानें वैयाकरणास अशा प्रकारचे वर्तन करता येत नाहीं. अशा स्थळी ती भाषा बोलणाराचा वैयाकरणाप्रमाणेच किंबहुना त्याहूनही जास्त अधिकार असतो; व वैयाकरणाचे कर्तव्य म्हटलें म्हणजे वळण देण्याचे आहे बाधण्याचे नव्हे, असे आम्हास वाटतें, हें लक्षात ठेवूनच वादग्रस्त चार मुद्यावर आम्हीं वर अभिप्राय दिला आहे; व आम्हास अशी उमेद आहे कीं, आम्ही सुचविल्याप्रमाणे बुककमिटीचे अध्यक्ष या गोष्टींचा अखेर निकाल नोकर व बिननोकर विद्वानांची सभा करून त्यातील बहुमताप्रमाणे ठरवितील. बुककमिटीनें क्रभिक पुस्तकांत ज्या काही इतर सुधारणा करण्याचे योजिले आहे त्याबद्दल स्वतंत्र रीतीनें पुन: एखादा दुसरा लेख लिहिण्याचा आमचा विचार आहे.