पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/424

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषेची लेखनपद्धति. g o일, वर्ण पूर्ण स्वरान्त लिहिण्याची वहिवाट आहे. इतकेंच नव्हे तर त्यास विभक्ति लागली असतां * विद्वानास * * शरदास ' अशीं अकारान्त शब्दाच्या रूपाप्रमाणे रूपें होतात, ही रूपे अपभ्रष्ट आहेत खरी; पण पुष्कळ संस्कृत शब्द अपभ्रष्ट होऊन ज्याप्रमाणें मराठींत आले व त्यांची अपभ्रष्ट रूपेंच आम्ही मराठी भाषैतील रूपे असे समजतेों, त्याप्रमाणेच व्यंजनान्त शब्दही मराठीत स्वरान्त मानले पाहिजेत. * क्वचित् ? सारखी काहीं अव्यर्थे व्यंजनान्त लिहावी असें कित्येकाचे म्हणणे आहे; आणि पहिल्या नियमासंबधानें आम्ही सविभक्तिक व अविभक्तिक शब्दाचा जो भेद केला तसा येथे केला असता * क्वचित् ’ हा शब्द व्यंजनान्त लिहिता येईल. पण इा भेद या बाबतीत काही महत्त्वाचा आहे असे आम्हांस वाटत नाही. कारण, मराठी शब्दातील अन्त्य * अ ’ अस्पष्ट उच्चारण्याची वहिवाट आहे. तथापि * कदाचित् ’ * क्वचित् ' वगैरे काहीं अव्ययाची रूपें व्यंजनान्त ठेवण्यास हरकत नाहीं. व्यंजनान्त शब्द स्वरान्त लिहावे असा जरी नियम बाधला तरी त्याचा अंमल प्रत्येक शब्दांवर केलाच पाहिजे, असा आग्रह धरीत बसण्यात कांहीं हसील नाहीं. मराठी भापा ईो वाढती आहे, पूर्ण झालेली भाषा नाही; सबब मराठीत शब्दाच्या शुद्धलेखनाच नियम अगदीं कायमचे न ठरविता सामान्यतः ठरवून काहीं शब्दास थोडीशी सवलत दिल्यानेच एकंदर भाषेची वृद्धि अधिक चागली होईल, असे आमचे मत आहे. * विद्वान्’ शब्दासंबंधार्ने तर आमचे असे मत आहे कीं, त्याचे स्त्रीलिग * विदुपी ' असें करण्याचा जेो प्रघात आहे, तो फाजील सोवळेपणाचा आहे * जानकीबाई विद्वान आहे ? हें मराठी वाक्य आमच्यामतें अशुद्ध नाहीं. उलट * जानकोबाई विदुषी आहेत ? हेंच कानास चमत्कारिक लागत. पुल्लेिगी शुद्ध संस्कृत शब्द मराठीत आला असता त्याबरोबर त्याचे सस्कृतांतील स्त्रीलिंगी रूपही मराठीत आले पाहिजे असँ म्हणता येत नाहीं, * पंडिता रमाबाई संस्कृता ’ ही मुराठीतील थट्टा आहे; बोलण्या तील शुद्ध मराठी नव्हे. चवथा नियम अनुस्वारासंबंधानै होय. शब्दाचे उच्चार करतांना कॉकणांत बरेच शब्द सानुनासिक तर देशात तेच शब्द निरनुनासिक उच्चारले जातात हें सर्वास माहीत आहे. व्याकरणदृष्टीने पाहिले तर यापैकीं खरा उच्चार कोणता, हें ठरविणें अवश्य आहे. कित्येकांचे असें मत आहे कीं, अनुस्वार हा कोंकणस्थानीं मराठी भाषेत उगीच घुसडला आहे; व त्यांना अजिबात फाटा दिल्यास भाषस अधिक सुगमता येऊन तिचे सौंदर्यही अधिक वाढेल. उलटपक्षीं असें म्हणणे आहे कीं, अनुस्वार हा पुष्कळ ठिकाणीं शब्दभेदामुळे जरूर आहे. जसें * आंबा ’; आबा ?* नांव ’, ‘ नाव; '* काकण '* कांटा ' वगैरे, शिवाय विभक्तीचे प्रत्यय रुळण्यासही त्यापासून मदत होते; याकरिता अनुस्वार जरूर आहेत. यासंबंधानें विचार करतां असे आढळून येईल कीं, अनुस्वार भाषेतून अजिब त ५ १