पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/404

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ३८९ म्हणणें काय आहे तें वर आलेंच आहे. परंतु तेवढयाकरिता तिनें उत्साहानें व कळकळीने चालविलेल्या उद्योगास विध्न आणण्याची आमची इच्छा नाही; इतर्केच नव्हे तर त्यासंबंधानें आक्षेप घेण्यास कांहीं आधार आहे, असें आम्हांस वाटत नाहीं. मग कूपमंडूकन्यायानें हिंदुधर्मासंबंधानें ज्यांची दृष्टि संकुचित झाली आहे, त्यांस काहीही वाटो.

  • विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः इातमुखः !

शिरोलेखात नमूद केलेला अर्थातरन्यास, प्रसिद्ध कवि भर्तृहरीनें, पवित्र गंगा नदीचे स्वर्गापासून शिवाच्या डोक्यावर, शिवाच्या मस्तकापासून हिमालयावर, हिमालयापासून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून समुद्रांत शंभर मुखांनीं जें अवतरण झालें त्यास अनुलक्षून योजला आहे. मराठींतही * बुडत्याचा पाय खोलांत ? अशी जी एक म्हण आहे ती याच अर्थाची होय. एकदा मनुष्य घसरूं लागला म्हणजे मग त्यास सावरण्याचा जे लोक प्रयत्न करितात त्याना देखील आपल्या खेह्याचीच अधःपतनगति स्वीकारावी लागते. प्रिन्सिपाल पराजपे याच्या * ईस्ट अॅड वेस्ट ? मधील निबंधावर टीकात्मक आमचा लेख आल्यानंतर प्रिन्सिपालसाहेबास अनुकूल म्हणून जे लेख आले त्या सर्वाची स्थिति याचप्रमाणे होय. केोणी म्हणतो कीं, शाळांत सर्व धमांच्या जातींची मुलें असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट धमांचे शिक्षण देणें अशक्य आहे, एवढाच प्रि. परांजपे यांच्या लेखाचा अर्थ आहे. दुसरा एक खेही असें प्रतिपादितो कीं, प्रो. परांजपे यांचा कटाक्ष वेडगळ धर्मसमजुतीवर आहे; खया धर्मतत्त्वांवर नाही. तिसरा एक भाष्यकार असे म्हणतो की, प्रि. परांजपे याच्या लेखावरील आमची टीका द्वेषमूलक आहे व त्यात प्रिन्सिपालसाहेबांच्या मुद्याचे कोठेही खडण केलेले नाहीं. चवथ्यास आमचा पूर्वीचा लेखाचा मथळा म्हणजे * प्रासादशिखरस्थोऽपि काको न गरुडायते ? हें वाक्यच काय तें झोंबत आहे ! येणेंप्रमाणे कोणास काहीं तर केोणास काहीं याप्रमाणें आमच्या लेखांतील विधानें न रुचून त्यांनीं प्रि. परांजपे यास उचलून धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु त्यांच्या दुर्दैवानें प्रि, सेल्बी यानीही आम्ही केल्याप्रमाणेच * ईस्ट अॅड वेस्ट * यांतील लेखाचा अर्थ केला असल्यामुळे आणि प्रि. परांजपे यांचे मत चुकीचे असून कै. रानडे किंवा डॉ. भांडारकर यांच्या मताप्रमाणे शुद्ध धर्मतत्त्वें शाळेत शिकविण्यास हरकत नाहीं असें आपले मत त्यांनी दिलें असल्यामुळे प्रिन्सिपालसाहेबांच्या टीकाकाराची बरीच तारंबळ उडून गेली आहे. प्रो. परांजपे काय म्हणतात याचा खरा अनुवाद करून त्याच्या मताचे समर्थन करण्यास हे तयार नाहीत,

  • ( केसरी, तारीख ३ १-५-१९०४)