पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९० लो० टिळकांचे केसरींतील लेख. किंबहुना तसे करणे अशक्यही आहे असे म्हटलें तरी चालेल. तेव्हां आतां * तूं नाहीं तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील ’ या न्यायानें वरील मंडळीनें प्रो. पराजपे याचे समर्थन करण्याचे सुरू केले आहे. ते म्हणतात कीं, केसरीकारांनीं डॉ. भाडारकर व कै. रानडे याजवरही सणसणीत टीका केली आहे आणि आता तुमच्यावरही तशीच करतात, अतएव युक्लिडच्या पहिल्या प्रत्यक्ष प्रमाणाप्रमाणे रानडे, भाडारकर आणि तुम्ही एकाच पंक्तींत बसलां आहा ! प्रो. परांजपे यासही गणितशास्रांतील कोटी कितपत मान्य होईल याचा त्यांच्या खेह्यानीं विचार केला नसावा असे दिसतें. कसेंही असो; माघ कवीनें एके ठिकाणीं म्हटल्याप्रमाणें एकदा सूर्य पतनोन्मुख झाला म्हणजे त्याचे * सहस्र कर ' देखील सदर पतनाचा प्रतिकार करण्यास समर्थ होत नाहीत, याचीच या टीकाकाराच्या लेखावरून आम्हांस आठवण होते. प्रि. परांजपे यांचा * ईस्ट अॅड वेस्ट ? मधील लेख .आम्हीं साग्र मननपूर्वक वाचलेला आहे. त्यांतील सिध्दान्त थोडक्यांत असे आहेत:-(१) हिंदुस्थानातील शाळात धर्मशिक्षण दिल्याने राष्ट्रीयत्वाची हानी होऊन तें देशास विघातक होईल; (२) धर्म हा नीतीचा पाया नसून नीति हा धर्माचा पाया आहे; किंवा असावा (३) धर्मवेड माजले म्हणजे तें कधीही आवरणार नाहीं; (४) धर्म म्हणजे केवळ वेडगळ समजुतींचा व आचारांचा एक भारा असून तो नवीन सुधारलेल्या विचारापुढे कायमचा टिकणें अशक्य आहे; आणि (५) सदर आचारच नव्हे तर एकंदर सर्व धर्माचीं तत्त्वेच चुकीचीं असल्यामुळे ती नाहीशी झाल्याखेरीज देशोन्नति व्हावयाचा नाही ! प्रेो. परांजपे याच्या लेखांतील हे पाच सिध्दान्त प्रो. मजकुरांस किंवा त्याच्या चहात्यापैकी कोणास जर सशास्त्र व सप्रमाण समर्थन करावयाचे असले तर त्यांनी त्या प्रयत्नास अवश्य लागाव अशी आमची त्यांस सूचना आहे. आमच्यामतें हे सर्व सिध्दान्त चुकीचे आणि अविचाराचे आहेत, इतर्केच नव्हे तर हल्लीं आमच्या शाळांतून व कॉलेजांतून धर्मशिक्षणाचा पूर्ण अभाव असल्यामुळे त्यांतून जी तरुण व हुशार मंडळी बाहेर पडतील ती प्राय: असल्याच आचरट विचाराची असतील आणि त्याचप्रमाणें प्रि.पराजप यांची स्थिति झालेली आहे. इंग्रजी विद्येत पारंगत झालेल्या ग्रॅज्युएटांची स्थिति पुढे पुढे बदलत जाऊन त्यापैकीं कांहीं वेदांत तर कांहीं थिऑसफीस्ट, कांहीं कर्मठ तर कांहीं योगी होऊन अखेर धर्मनिष्ठ व श्रद्धावान् बनतात, ही गोष्ट सर्व प्रसिद्ध आहे. हा दोष आमच्या तरुण मंडळाचा नव्हे तर त्यांस मिळत असलेल्या शिक्षणाचा आहे, असे आम्ही अनेक वेळा सांगितलें आहे; व हें जर आमच्या प्रतिपक्षानें लक्ष्यांत ठेवले असतें तर ब-याच शाईंचा व कागदाचा आज जो फुकट व्यय झाला आहे तो झाला नसता. प्रेि. पराजप यांच्याविरुद्ध जी आम्हीं टीका केली आहे ती ते प्रिन्सिपाल नसते तर आम्ही कधीही केली नसती, हें मागील लेखाच्या मथळ्यावरून सहज दिसून येणार