पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rくく लो० टिळकांचे केसरींतील लेख. पण तेवढ्यामुळे शैव किंवा वैष्णव एवढेच काय ते हिंदु आणि बाकीचे हिंदुधर्मी नव्हत असें होत नाहीं. व्यापक दृष्टीनें पाहिले म्हणजे भक्ति ज्ञान, कर्म श्राणि योग या चारही पंथातील लोक किंवा उपास्य भदानें पाहिलें तर शैव वैष्णव, गाणपत्य, भागवत, वगैरे लोक सर्व हिंदुधर्मीच होत, असे मानणें भाग आहे. आणि अशा दृष्टीनें पाहिले म्हणजे हिंदुधर्म हा नुसता शैव, नुसता भागवत किंवा नुसता भाक्तभार्ग नव्हे, असे त्याचे लक्षण करणें अवश्य पडतें. ही कल्पना आजकालची आहे असें नाहीं. ** यं शैवाः समुपासते शिव इति ब्रहोति वेदातिनः ” हृा केिवा महिम्नातील ** त्रयी साख्यं योग: पशुपतिमतं वैष्णवमिति ” हा ठीक आणला असता आमच्या म्हणण्याची सत्यता कळून येईल. या प्रत्येक मताच्या मुळाशीं हिंदुधर्म आहे हें खेरै; पण त्याचबरोबर हिंदुधर्म हा एका मतापेक्षा अधिक व्यापक आहे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. हिंदु कॉलेजांतील * नॅशनल साग ’ मध्यें हेंच तत्त्व ग्रथित केले आहे; व त्यांतील * वैदिक ? या पदाची ओढाताण करून हिंदु कॉलेजात शिकवला जाणारा हिंदुधर्म वेदबाह्य आहे, असें दाखविण्याचा किलेकानीं केलला प्रयत्न अगदीं हास्यापद आहे. कोणास हिंदुधर्म हें नांव आवडत नसल्यास या सामान्य धमसि पाहिजे तर *वैदिकधर्म'किंवा ‘भारतधर्म' म्हणा.परंतु त्यास कोणतेंही नांव दिलें तरी हिंदु धर्मात जे नानापंथ आहेत त्या प्रत्येक पंथाहून तो भिन्न व अधिक व्यापक आणि अतएव या सर्व पंथांना मूलभूत होऊन राहिलेला आहे. या व्यापक हिंदुधर्माचे किंवा भारत धर्माचे लक्षण वेदातांतील ब्रह्माचा लक्षणाप्रमाणें * तो अमुक नाहीं तो तमुक नाहीं ? अशा प्रकारचे करावें लागतें. आणि वर निर्दिष्ट केलेल्या पद्या (Song)मध्यें अशाच रीतीनें हें लक्षण सांगितले आहे. हें चूक आहे असें प्रतिपादन करणे म्हणजे हिंदुधर्माच्या व्यापक स्वरूपाबद्दल कूपमंडूकन्यायानें आपलें अज्ञान प्रदर्शित करणें होय. आचार्यानीं जर ही पद्धत स्वीकारली असती तर त्यांस बौद्ध व जैन धर्माचे कधीही खेडन करतां आले नसतें; व त्यांच्या भाष्यांत आमच्या धर्माचे जें उदात्त स्वरूप नजरेस येतें तेंही आले नसतें. शैव किंवा वैष्णव हिंदुधर्मी आहेत; पण हाच सिद्धान्त उलट करून हिंदुधर्म म्हणजे शैव-धर्म किंवा वैष्णवधर्म असे म्हणणें म्हणजे न्यायशास्रांतील एका प्रसिद्ध हेत्वाभासाचा आश्रय करणे होय. हिंदु कॉलेजाकरितां रचलेल्या राष्ट्रीय गीतामध्यें जें हिंदु धर्माचे लक्षण दिले आहे तें या तत्त्वावरच दिलेले आहे; आणि त्यांत * न वैदिकोहं ? असा उल्लेख अस. ल्यामुळे जर हें लक्षण चुकीचे म्हणावयाचे तर * त्रयी ? (तीन वेद) हा शब्द वरील महिम्नांतील छेोकात आहे म्हणून त्यांतील विचारही वेदबाह्य मानावे लागतील. परंतु हिंदु कॉलेजावरील आक्षेपकांनी इतका खोल विचार कां म्हणून करावा ? त्याची सर्व मदार बिझांटबाई विदेशी आहे एवढ्यावरच अवलंबून आहे. आणि या त्यांच्या मतास जिकडून जोर मिळेल ती खटपट करण्यास ते तयार आहेत. बाईवर विदेशीपणासंबंधानें जेो आक्षेप आहे त्यासंबंधानें आमचे