पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/402

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थिऑसफी आणि हिंदुधर्म. ३८७ त्यांच्याकडून जो उद्योग होत आहे ताँ विशेष योग्यतेचा आहे. थिआसफीतील कांहीं गुह्य तत्त्वें हिंदुधर्मात नसतील, पण तेवढ्यामुळे धर्मनेिं हिंदु झालेल्या थिआसफिस्टांस हिंदु कॉलेजांत हिंदुधर्माचे शिक्षण देण्यास अधिकार नाहीं, असें आम्हास वाटत नाहीं. हिंदुधर्म हा थिआसफीच्या आधीं कितीतरी हजार वर्षे चालत आलेला आहे; व आज थिआसफिस्ट पंथ निघाला नसता तर हिंदुधर्माची उन्नति झाली नसती असेंही आम्ही म्हणत नाहीं. तथापि आमच्या सनातन धर्माचे स्वरूप लेोकापुढे मांडण्याची जी प्राचीन पद्धत आहे, तीत कांहीं तरी सुधारणा करून हिंदुधर्माची माडणी ( धर्म नव्हे) हल्लींचा काळ लक्षांत आणतां निराळ्या त-हेर्ने करणें जरूर आहे, असें आमचे मत आहे. हिरा जरी खरा आणि मौल्यवान् असला तरी ज्याप्रमाणें निरनिराळ्या काळीं प्रवृत्त असलेल्या रुचीप्रमाणें त्यास निरनिराळे कोदण करावें लागतें, तसाच धर्मीचाही प्रकार आहे. मग तो धर्म हिदु असेो, बौद्ध असेो वा खिस्ती असेो. आधिभौतिक शास्त्राच्या प्रसारानें खिस्तीधर्माच्याही मांडणींत पुष्कळ फेरफार झालेला आहे आणि तशा प्रकारचा फेरफार हिंदुधर्माच्या मांडणीत (धर्मीत नव्हे) होणें जरूर आहे. थिआसफीनें हिंदुधर्मापासून पराङ्मुख झालेल्या पुष्कळ सुशिक्षितांस पुनः हिंदुधर्माकडे वळविलें, यांतील बीज हेंच आहे. भिषग्वर्य शंकरशास्री पदे किंवा भारतमहामंडळाचे उपदेशक पंडित दीनदयाळ यांच्या लक्षांत ही गोष्ट आला नसावी किंवा तिचे महत्त्व यास समजलें नाहीं असे दिसते. एरव्हीं हिंदु कॉलेजाकरिता हिंदुधर्माचीं जीं पुस्तकें तयार झाली आहेत, त्यांवर त्यानीं विनाकारण आक्षेप घेतले नसत. हीं पुस्तकें इंग्रजींतच आहेत. अशा प्रकारचे आक्षप यावर घेण्यांत आले आहेत. पण याचा दोष बिझांटबाईकडे नसून इंग्रजी राज्याकडे आहे. विद्याथ्यौस संस्कृत शिकविण्याकरितां डॉ. भांडारकर यानीं केलेली पुस्तकें जर इंग्रजींत आहेत, आणि वेद जर सरकारी कॉलेजातून इंग्रजी भाषेतच शिकविले जातात, तर हिंदू कॉलेजाचीं धर्म पुस्तकें इंग्रजीत आहेत, अशी ओरड करण्यात काहीं अर्थ नाहीं. मद्रासतील हिंदु विद्वान् गृहस्थानीं संध्येचे व पुरुषसूक्ताचे भाषांतर विद्याथ्र्याकरितां इंग्रजीत केले आहे, ही गोष्ट इकडे माहीत नाहीसे दिसतें. हिंदु कॉलेजातील विद्याथ्यांकरितां रचलेल्या * नॅशनल सॉग ’ मध्ये हिंदुधर्माचे जें लक्षण केले आहे तें चुकीचे आहे, आणि तें जातिधर्म बुडविण्याकरितां केले आहे, असा आक्षेप प्रमुखत्वानें पुढे आणण्यात आला आहे. परंतु हा आक्षेप चुकीचा असून, तो पुढे करणाच्यास हिंदुधर्म म्हणजे काय हें समजत नाहीं असें म्हणणें भाग आहे. भिन्न मताच्या किवा पंथाच्या लोकात आपापसांत जेव्हां तंटे चालतात तेव्हां शैवांनीं वैष्णवास, तुमचा धर्म खोटा आहे, असें म्हणावें किंवा अद्वैत्यांनीं द्वैत्यांस, योग्यार्ने सांख्यास आणि भागवतानीं ज्ञानमार्गातील लोकांस शिव्या द्याव्या, हें योग्य नसले तरी प्रचारांत चालू आहे.