पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o हर्बर्ट स्पेन्सर. ইA৩ % हर्बर्ट स्पेन्सर न हि ज्ञानेन सदृशं पवित्नमिह विद्यते । भगवद्गीता. हर्बर्ट स्पेन्सर यांचे नांव महाराष्ट्रांतच काय पण सर्व जगभर प्रसिद्ध झालेले असून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे कांहीं प्रसिद्ध तत्त्ववेते झाले त्यांच्यामध्यें हर्बर्ट स्पेन्सर यांस सर्वानुमतें अग्रपूजेचा मान मिळालेला आहे. हे तत्त्वज्ञानी पुरुप आपल्या वयाच्या चाँदपाशाव्या वर्षी इहलोक सोडून गेल्याचे वर्तमान गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहे. अशा वेळीं त्यांनीं तत्त्वज्ञानात जी कांहीं भर घातली त्याचे थेोडेसे विवेचन करून तत्त्वज्ञ या दृष्टीनें या पुरुपाची योग्यता किती होती याचा महाराष्ट्र वाचकास आणखी थोडासा परिचय करून देण्याचा अाज आमचा विचार आहे. २ा. रा. दाभोळकर यांनीं प्रसिद्ध केलेल्या ग्रथमालेंत स्पेन्सरचे ज्ञेयमीमासा व अज्ञेयमीमांसा हे ग्रंथ प्रसिद्ध झाले असून खेरीज नीतिशास्र, न्यायतत्त्वें, परोपकार वगैरे विपयांवरील स्पेन्सरसाहेबांचे विचार त्यांत आले आहेत. आणि अज्ञेयमीमांसा या ग्रंथाच्या अखेरीस स्पेन्सरसाहेबांचे चरित्रही जी :ण्यांत आले आहे. तेव्हां त्यासबंधानें येथे जास्त लिहिण्याचे कारण नाहीं. शिवाय तत्त्वज्ञाचे चरित्र म्हणजे सतत अध्ययन, विचार आणि ग्रंथलेखन यावेरीज त्यांत दुसरे काय सापडणार ? तशांत जे गृहस्थ आमरणात ब्रह्मचारी होते व पैशाकरिता, इतर संसारसुखाकरिता अथवा सामाजिक अगर राजकीय सन्मानाकरितां ज्यांनी तहाहयात तिळमात्रदखील काळजी केली नाहीं त्या स्पेन्सरसाहेबासारख्याच्या चरित्रात सांसारिक लोकास मनेोरंजक अशी माहिती मिळणे बहुधा अशक्यच आहे. त्यानी ज्या तत्वज्ञानाचा आमरणात अभ्यास केला व आपल्या विचारानें तत्संबंधीं जे नवीन सिध्दान्त जगापुढे मांडले तेच त्याचे खर चरित्र होय, व तशाच प्रकारचे थोडे चरित्र आज आम्हीं खाली देत अाईो. शरीरप्रकृती नाजूक असूनही तिची सबब न सागता आजन्म विद्याव्यासग आणि तत्त्वावचार यात आपला सर्व वेळ घालविणार व स्वभावत:च वैराग्यशील आणि विगततृष्ण असे महापुरुष आपल्या देशात प्राचीनकाळीं बरेच होत असत परंतु ती प्रवृत्ती नाहींशी होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत; व इंग्रजी शिकलेल्या विद्वानांतही वैराग्य, तत्वज्ञान, सतत विद्याव्यासंग हे गुण अद्याप दृष्टीस पडू लागले नाहीत. अशा स्थितींत स्पेन्सरसाहेबाचे चरित्र प्रत्येक विचारी पुरुपानें मनन करून अनुकरण करण्यासारखे आहे. असे पुरुष आमच्या देशांत हल्लीं उत्पन्न होत नाहीत हें आमचे दुर्दैव होय. तथापि मोठे कवि किंवा महान् तत्त्वज्ञ हे कोणत्याही देशांत जन्मले असले तरी ते सर्व जगाचे उपकार

  • (केसरी ता. १५ डिसेंबर १९०३ ).