पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५६ ली० टिळकांचे केसरींतील लेख. काही अशक्य नाहीं. पण हिंदु धर्मावर ग्रंथ हवे आहेत कोणास ? हजारों रुपये खर्च करून शाळाखात्यांतील क्रमिक पुस्तकें सुधारण्याकरितां आतां कमिटी बसणार आहे; व या कमिटीचे काम पुर झाले म्हणजे आमच्या शाळांतील क्रमिक पुस्तकांतून धर्माचा, देशाभिमानाचा किंवा अधिकायांच्या दृष्टीनें राजद्रोहाचा मल धोब्याप्रमाणें ही कमिटी काढून टाकून शाळांतील क्रमिक पुस्तकें अगदीं निलैंप बनवील, अशीं कीं, तीं वाचल्यानें कोणाच्याही मनांत * मेंढ्यावरी लोकर दाट भारी ’ याच्या पलिकडच विचार कधीही उद्भवू नयेत. परंतु क्रमिक पुस्तकें अशा रितीनें सॉवळीं करण्याच्या कामी जी डायरेक्टरसाहेबाची कदर दिसून येते तिच्या शतांश तरी धर्मशिक्षणाची पुस्तकें तयार करण्याच्या कामी त्यांची आस्था आढळून येते काय ? नाही. मग धर्मशिक्षण पाहिजे म्हणून रिकामी ओरड कशाला ? लोकाचीं पुस्तके घ्यावयाचीं नाहींत आणि स्वतः तयार करावयाचीं नाहीत, मग सुधारणा तरी कशी होणार ! हिंदु कॉलेजांप्रमाणें आमच्यांतील खाजगी शाळांनीं इकडे लक्ष द्यावयाचे; पण क्रिकेटच्या खेळात गोया-पीराकडून मार खाऊनही पुन: ज्यांस चुप बसण्याचे व्रत पत्करावें लागले व आम्ही निर्दोष म्हणून साहेबांनी दिलेली सर्टिफिकिटें लोकांस दाखविण्यातच जे समाधान मानून घेतात, अथवा सरकारच्या थोड्याशा आश्रयाकरितां सर्व प्रकारें त्यांची शिक्षणाची पद्धतच आम्ही स्वीकारूं त्यानीं पसंत केललीं पुस्तकेंच सुरूं करूं आणि त्यांस भान्य नसलेल्या उलाढालीत पडणार नाही अशी ज्यांनीं शपथ वाहिली त्याच्या हातून काय होणार ? सरकारी शिक्षणांतील उणीव दूर करणे हैं जें खाजगी शिक्षणाचे कर्तव्य तें हल्लीच्या स्थितीत दुरापास्त झालेले आहे. सरकार धर्मशिक्षणाच्या बाबतींत बोलण्यापेक्षा ज्यास्त कांही करूं इच्छित नाहीं आणि खाजगी शाळांचे मालक तर बोलावयास देखील भितात. अशा स्थितींत विद्याथ्याँस धर्मशिक्षण देण्याचा एकच मार्ग आहे आणि तो हा कीं त्या त्या धर्मातील लोकांनीं आपल्या धमीच्या शिक्षणाकरितां मुख्य मुख्य ठिकाणीं स्वतंत्र धमीपुरत्याच शाळा काढाव्या व त्यातून आनिबिझाट यांनी केलेल्या पुस्तकांच्या किंवा व्याख्यानाच्या रूपानें धर्माची जागृती ठेवावी. असें न होईल तर धर्माच्या खय्या स्वरूपाची ओळख उत्तरोत्तर कमी झाल्याखेरीज राहणार नाहीं. वर सांगितल्याप्रमाणें धर्मावर कांहीं नवे ग्रंथ होत आहेत हें सुचिन्ह आहे. पण तेवढयानेंच कार्यभाग होईल, असें आम्हांस वाटत नाहीं.