पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/359

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ ४ लो० टिळकांचे केसरींतील लेख त्यांच्या वक्तृत्त्वाचा लाभ तेथील लोकांस मिळाला. पण हें त्यांचे वक्तृत्त्व शेवटचे होय असें तेव्हा कोणासही वाटलें नाहीं. रविवार ता, १६ रोजीं नित्याप्रमाणे ते ब्राह्मणसभेत संध्याकाळीं जाऊन वि-हाडी आलें आणि जेवणखाण करून मंडळींशीं कांहीं वेळ बोलतही बसले होते. ह्या सबंध दिवसात अगर या पूर्वी दोन तीन दिवसही त्याच्या मनाला त्रास किंवा श्रम होईल अशी कोणतीही गोष्ट म्हणजे व्याख्यान, वादविवाद वगैरे घडून आली नव्हती. रविवारीं रात्रीं ते नेहमीं प्रमाणेच निजावयास गेले; आणि सुमारें घटकाभराने आथरुणात कण्हावथास लागले. तेव्हा शेजारच्या मंडळींनी त्यास जागे केले, आणि काय होतें म्हणून विचारिलें सर्वागास घाम आला आहे व मुग्या येतात असे त्यानीं सागितलैं. तेव्हां डॉ. देशमूख जवळच होते त्यास बोलावून आणिले. तोपर्यंत त्यांस शुद्धि होती. परंतु ती लवकरच नाहीशीं होऊन अखेरपर्यंत ते बेशुद्ध होते. डॅक्टिराच्या परिक्षवरून असे कळतें की, त्याच्या मस्तकात रक्त एकाएकीं चढून अधीग वायू होते वेळी जसा झटका येतो तसा झटका आलेला आहे; आणि मेंदूंतील एखादी शीर फुटून रक्तही मेंदूंत जाऊं लागले आहे. अशा प्रकारचा रोग दु:साध्य असतो. औषधोपचार जेवढे करावयाचे तेवढे केले; पण त्या ना काहीं एक उपयेाग न होता प्रो. जिनसीवाले यास वर लिहिल्याप्रमाणें मगळवार तारीख १८ रोजीं सकाळीं ७॥ वाजता बेशुद्धीतच देवाज्ञा झाली. त्याच्या स्मशानयात्रेची हकीकत दुसरीकडे दिलीच आहे. त्याच्या पश्चात् त्याची बहीण व चुलत भावाचा मुलगा हेच काय ते जवळचे आप्त आहेत. पण यापैकी मरणसमयीं त्याच्याजवळ केोणीही हजर नव्तते. याची शरीर प्रकृती सामान्यतः निकोप होती; व एकावन्नाव्या वर्षी त्याजवर एकाएकीं असा प्रसंग येईल असे कोणासही वाटले नव्हतें. परंतु ईश्वरी नेमानेम कहीं विचित्र असतात; आणि ते अशा उदाहरणावरूनच आमच्या प्रत्ययास आणण्याची ईश्वराची इच्छा असते असे म्हणणे भाग येतें. असो; वरील हकीकतीवरून प्रेो. जिनसावाले हे कोणत्या प्रकारचे मनुष्य होते हैं सामान्यत: लक्षात येईल. परंतु ज्याकरिता त्याच्यासाठीं आम्हास हळहळ वाटते त्याचे कारण निराळेच आहे. इंग्रजी विद्येचा या देशांतील ज्या पुरुषांच्या बुद्धीवर संस्कार झालेला आहे त्याच्यामध्यें प्रो. जिनसीवाले याचे उदाहरण हें एक विशिष्ट प्रकारच्या तत्त्वाचे द्योतक होते; व याच्या चरित्रापासून कोणास काहीं धडा ध्यावयाचा असेल, तर तो या संबंधाचाच होय. सामान्य प्रतीच्या निश्वयी पुरुषाच्या बुद्धींतही इंग्रजी विद्येने हिंदुधर्म, हिंदुआचार, हिंदुगृहस्थति या संबंधाने व्यामोह उत्पन्न होऊन त्याबद्दलच्या त्याच्या मतात आणि आचारात एक प्रकारचा दुहेरीपणा किंवा द्विधाभाव उत्पन्न होत असतो; आणि पुष्कळ वेळां हें करूं कीं तें करूं, विजार घालू कीं धोतर नेसू, बायकोस शिक्षण देऊं कीं न देऊं, आपल्या देवळांत जाऊन मूतींस नमस्कार करू का खिस्ती लोकांसारखे बिनमूर्तीचे देवालय करून तेथे प्रार्थना करूं, संध्या करूं कीं प्रार्थना गीतें म्हणू,