पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. श्रीधर कृष्ण जिनसीवाले. ३४५ अशा प्रकारच्या संशयांनीं त्याचे मन घोंटाळून जाऊन कित्येकदां तो ** न संध्यां संधत्त नियमित निमाजान्नकुरुते ” अशा प्रकारें कांहीच करीत नाहीं, किंवा कांहींतरी आचरट आचरण करीत सुटते. इतकंच नव्हे, तर पाश्चिमात्य व पौर्वात्य सुधारणांची जी हल्लीं टक्कर चालू आहे, त्यांत इंग्रजी शिक्षणानें सुशिक्षित झालेल्या वर्गाच्या मनाची स्थिती अशी होणें स्वाभाविकच आहे. अशा रीतीनें आपल्या मनाचे समाधान करून घेत असतात. हे त्यांचे विचार बरोबर नाहींत हें प्रतिपादण्यास प्रेो. जिनसीवाले हे एक चांगलें उदाहरण होतें. प्रेो. जिनसीवाले यांची विद्वत्ता इतर एम्. ए. पेक्षां काहीं कमी नव्हती, कांकणभर जास्तच होती हें केोणासही कबूल करावें लागेल. पण इंग्रजीचा अभ्यास पुरा होण्यापूर्वी त्यांच्या घरचे जे त्यांस शिक्षण होतें, वडिलांपासून जे अनुवंशिक संस्कार त्यांच्यामध्ये आलेले होते व दारेिद्यदिकानें ज्यांचीं मुळे खोल गेललीं होतीं त्या संस्कारामुळे इंग्रजी विद्येचा वर लिहिलेला अनिष्ट परिणाम त्यांच्या मनावर झाला नाहीं. मी हिंदु आहे, माझा धर्म वैदिक आहे, त्या धर्माच्या परंपरेनें ईश्वरोपासनेचा जेो मार्ग लावून दिला आहे तो बदलण्याची कांहीं आवश्यकता नाहीं, तो मला पाळला पाहिजे, व त्यांतच माझें व माझ्या देशाचे कल्याण आहे; सारांश मी हिंदु आहे, हिंदु राहीन, हिंदु मरेन आणि हिंदुत्यानेंच आपला अभ्युदय केव्हांना केव्हां तरी संपादन करीन असा त्यांचा पूर्ण विश्वास होता; आणि तो विश्वास बदलण्यास पाश्चिमात्य शिक्षणाची सबब इतर सुशिक्षित पुढे आणतात ती खरी नाहीं असें त्यांनी आपल्या आचरणांवरूनच सिद्ध केलें होतें. प्रो. जिनसीवाले यांच्या चरित्रापासून तरुण मंडळीनें जर कांहीं विशेष बोध घ्यावयाचा असेल तर हाच होय. वारा वाहील तशी पाठ फिरविण्याची ज्याना संवय आहे, उपहासास किंवा त्रासास न जुमानतां आपलेपणा कायम ठेवण्याचे ज्यांच्या आांगीं धैर्य नाहीं अशा लोकांनीं प्रो. जिनसीवाले सारख्यांची थट्टा केली आहे व पुढेही करतील. पण तरुण पिढीनें एवढी गोष्ट लक्षांत ठेवावी कीं, देशामध्ये कांहीं करारी पुरुष उत्पन्न होऊन त्यांच्या हातून देशाचे जर कांहीं कल्याण व्हावयाचे असेल तर तें या मार्गार्ने व्हावयाचे नाहीं. प्रो. जिनसीवाले यांस सुधारणा नके होती असें नाहीं, किंबहुना ज्या आपल्या पत्नीस गृहकृत्यांत थेोडीशी चूक केल्यामुळे त्यांनी शिक्षा केली असा बोभाटा झालेला आहे त्या पत्नीस संस्कृत व इंग्रजी शिक्षण देऊन विद्वान् करण्याचे त्यांच्या मनांत होतें व त्या त्या प्रमाणे त्यांनीं तजवीजही केली होती, हें त्यांच्या मित्नांपैकीं पुष्कळांस माहीत असेलच. पण अशा प्रकारची सुधारणा करणें जरी त्यांस पूर्णपणें संमत होतें तरी इतर बाबतीत * डबल लाईफ ? म्हणून जेों कांहीं आचरटपणा सुरू झाला आहे तो त्यांस बिलकूल मान्य नव्हता; आणि त्यांचा स्वभाव जात्याच निश्चयी असल्यामुळे ते त्याचा निषेधही मोठ्या निश्चयानें आणि निग्रहानें ४३