पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/350

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


बडोदें राज्यांतील बालविवाहाचा कायदा. ३३५ बांच्या हुशारीचे कौतुक करतील. पण हिंदुस्थानांतील लोक उत्तरोत्तर अधिक ज्ञानसंपन्न होऊन विद्या, शास्त्रे, उद्योगधंदे, व्यापार वगैरे बाबतीत हळुहळू राज्यकत्यांच्या पंक्तीस बसण्यास योग्य व्हावे असे ज्यांस वाटत असेल त्यांस लॉर्ड कईन याची ही कृति चुकीची वाटून ती हिंदुस्थानच्या उत्कर्षास घातुक आहे अशी खात्री होईल. युनिव्हर्सिट्या सुधारावयाच्या होत्या तर त्याकरितां एवढा खटाटोप करण्याची काही एक जरूरी नव्हती. दहापांच गरीब विद्यार्थी युनिव्हर्सिटीतून तयार होऊन बाहेर पडल्यानें शिक्षणाची इभ्रत कमी होते हें मत आम्हांस बिलकूल मान्य नाही. उलट हिंदुस्थानची हल्लींच स्थिति अशी आहे कीं, गरीब परंतु बुद्धिमान् विद्याथ्यास अधिक उत्तेजन दिल्यानेंच देशात विद्येची अभिवृद्धी ज्यास्त होण्याचा संभव आहे. पण कमिशनाने या गोष्टीचा नीटसा विचार केलेला दिसत नाहीं. युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थेत सरकारचा अधिक ताबा कसा रहावा, नोकरीसाठीं जरूर त्यापेक्षा अधिक ग्रंज्यूएट बाहेर न पडण्याची काय तजवीज करावी, कॉलेजातून बाहेर पडणा-या विद्याथ्यांच्या आगी बेताबाता नाच स्वाभिमान राहील अशा प्रकारची कोणती शिस्त कॉलेजात ठेवावी, किंवा खाजगी शाळा आणि कॉलेजे याच्यावर कोणत्या प्रतीची देखरेख असल्यानें सरकारी शाळेतील किंवा कॉलेजांतील विद्यार्थी तयार होतील, इत्यादि प्रश्नच कमिशनास महत्त्वाचे वाटले आहेत व त्याचाच ऊहापेोइ त्याच्या रिपेोटीत झाला आहे. अर्थात् हें सर्व विवेचन व खटपट सरकार के वास्ते झालेली आहे. लोकाच्या तर्फे या विषयाची चर्चा केव्हा होईल ती होवेा. लॉर्ड कईन याच्या कारकिर्दीत होईल अशी आशा आम्हास तरी वाटत नाही. "σκαμπα.

  • बडोदें राज्यांतील बालविवाहाचा कायदा.

| एकंदर देशी संस्थानिकामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याइतके विद्वान्, हौशी, उद्योगी, चतुरख, वाक्पटु व हिंमतदार राजे क्वचितच सापडतील * म्हटले तरी चालेल. महाराज गादीवर बसल्यापासून तेवीस चेोवीस वर्षात बडोदें राज्याची पुष्कळ त-हेर्ने सुधारणा झाली आहे व त्याचे श्रेय काही अंशी महाराजाकडे व ब-याच अंशाने सुदैवाने त्याना जे वेळोवेळीं चागले ऑफिसर मिळत गेले त्याजकडे आहे असे म्हटले पाहिजे राजा सर टी माधवरावासारख्या मुत्सद्दयाने जी एकंदर राज्याची शिस्त घालून दिली ती बहुतेक अशानें हल्लीच्या महाराजानीं पुढे चालविली हें त्यास भूषणावह आहे; व हल्लीं गाकवाडीची जी चांगल्या नावाजलेल्या संस्थानांमध्यें गणना होते त्याचेही मुख्य कारण सुव्यवस्थित राज्यपद्धति व खुद्द महाराजांची कारभारांतील बारीकसारीक गोष्टीविषयीं दक्षता

  • (केसरी ता. १९-५-१९०३ )