पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३४ लो० टिळकांचे केसरींतील लेख. शिकविणारी कॉलेजें बंद करणें, इलाख्यांत एकच लेों -क्लास ठेवणे वगैरे कमिशनच्या ज्या सूचना आहेत त्यांचा हेतु काहींही असेो, परिणाम आम्ही वर लिहिल्याप्रमाणेच घडून येईल यात शंका नाही. युनिव्हर्सिटींत हल्लीं ज शिक्षण दिले जातें त्याची योग्यता वाढविण्याकरिता या सूचना आहेत असे कमिशननें म्हटले आहे पण ही गोष्ट जर खरी आहे, तरी हल्लीं सरकारी कॉलेजांतून तिसया चौथ्या प्रतीच्या प्रोफेसराचे जे भग्ताड भरलें होतें तें कमी करून त्याच्या ऐवजीं खरोखरच पहिल्या प्रतीचे विद्वान् प्रेफसर आणण्याची सूचना कमिशनानें करावयास पाहिजे होती, पण तशी किंवा त्याप्रकारची दुसरी कोणतीही सूचना हल्लींच्या रिपोर्टात आढळून येत नाही. चागल्या लायब्रच्या किंवा लेबोरेटया स्थापण्याबद्दल सूचना केलेली आहे, पण सरकार जॉपर्यंत या कामाकडे सढळ हाताने पैसा खर्च करण्यास तयार नाही तोपर्यंत ही सूचना कशी अमलांत यावी हें आम्हास समजत नाही. युनिव्हर्सिटीमध्ये आजपर्यंत नेटिव्ह लोकांचा थोडाबहुत तरी हात असे, पण इतउत्तर सर्व व्यवस्था सरकारच्या तंत्राने व धोरणानें चालावयाची असून नाणें पाडण्याच्या टांकसाळीप्रमाणे नेोकर तयार करण्याच्यायाही टाकसाळी सरकार आपल्या पूर्ण कबजांत ठेऊन नोकरीच्या व्यवहारास जरूर लागतील त्यापेक्षां अधिक छापवाले ग्रंज्यूएट बाहर न पडतील अशी तजवीज ठेवणार असें हल्लींच्या कमिशनच्या रिपेोटीवरून स्पष्ट दिसत आहे. सरकारचा हा हेतु सरकारच्या दृष्टीनें जरूरीचा किंवा उपयुक्त असेल, पण पहिल्यानें सागितलेल्या लोकांच्या दृष्टीने पाहात हें प्रगतीचे नव्हे तर दुर्गतीचे चिन्ह आहे असे म्हणणे भाग पडतें. कोणच्याही देशात किवा राज्यात नोकर तयार करण्याकरितांच विद्यादान करावयाचे हें मतच मुळी चुकीचे होय; व लॉर्ड कर्झनसारख्या मुत्सद्यास ज्या अर्थी हें मत पसंत झाले आहे त्या अर्थी उच्च प्रतीच्या शिक्षणाची त्याचे हातून योग्य व्यवस्था कधीही लागणार नाही असे म्हणण्यास हरकत नाहीं. लेॉर्ड कझैन हे स्वत: हुषार व कर्ते आहेत हे निर्विवाद आहे. पण नुसती हुशारी किंवा कर्तृत्व आंगी असल्यानें कोणाही व्हाइसरायाकडून् हिंदु लोकाचे कल्याण होईलच अशी खात्री देतां येत नाहीं. वरील गुणाखेरीज लोकाची सहानुभूती व त्याच्या उत्कर्षाबद्दल खरी कळकळ हे गुणही राज्यकत्यांच्या आगी असाव लागतात. हे गुण लॉर्ड कर्झन याच्या अंगी असलेले अद्याप दिसून आले नाहींत व पुढेही दिसून येतील असे वाटत नाही. याचा परिणाम असा झाला किवा होईंल की, युनिव्हर्सिटी कमिशन, पोलिस कमिशन, इरिगेशन कमिशन वगैरे जे जे विषय त्यानीं हाती घेतले आहेत त्या सर्वांचा अखेर निकाल प्रजेच्या तर्फेचा न होतां उलट लोकाच्या उत्कर्षाची आशा मात्र आणखी कांहीं वर्षे असल्या कमिशनांनीं कुंठित होऊन राहील. हिंदुस्थानांत इंग्रज लोकाचे राज्य चिरायु होण्यास देशातील निरनिराळ्या खात्यांची व्यवस्था अशाच प्रकारची असली पाहिजे, असें ज्याचे मत असेल तें लॉर्ड कर्झनसाहे