पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. हेंच होय. वेद्रोक्तासारखीं कांहीं खुळे मधून मधून उद्भवतात. नाही असे नाहीं; व त्यापासून कमी अधिक प्रमाणार्ने संस्थानची हानिही होत आली आहे. सामान्य लोकांप्रमाणें श्री. सयाजीरावमहाराज हे क्षणिक मनोविकाराचे आधीन होण्यास पात्र असल्यामुळे व त्याच्यासारख्या अधिकारारूढ माणसाना निर्मिड पण अप्रिय सत्यबोध करणारे सल्लागार क्वचित् भटत असल्यामुळे त्यांच्या सारख्याचे हातून अनेक वेळां प्रमाद होण्याचा संभव आहे. परंतु एकंदरीत महाराजाचे हेतु चागले असून आपल्या चुका कोणीही दाखवल्या तरी प्राजलपणे ऐकून सुधारण्याकडे त्यांची नेहमीं प्रवृत्ती असल्यामुळे अजूनही बडोदें संस्थानचे महाराजाचे कारकीर्दीत पुष्कळ हित होईल, अशी बळकट आशा आहे. मतवैचित्र्य व मार्गवैचित्र्य चेोहोकडे आहेच त्यामुळे महाराजाचे पुष्कळ विचार व कृती आम्हास पसंत पडत नसतील. परंतु आपल्या प्रजेची स्थिति सर्व बाजूंनीं उत्तरोत्तर चांगली होत जावी, ही महाराजाची उत्कट इच्छा फार अभिनंदनीय व इतर संस्थानिकानीं अनुकरण करण्यास रखी आहे यात शंका नाही. बडोदें दरबारात जी मधून मधून खुळे उत्पन्न होतात म्हणून लिहिलें, त्यापैकीच हल्लीं एकदेोन वर्षे सामाजिक व धार्मिक सुधारणेचे वारे महाराजाचे डोक्यात शिरले आहे तें एक होय असे म्हटले तरी चालेल. बडोदें संस्थानातील लोकाची सापतिक, नैतिक व धार्मिक स्थिति सुधारण्यास पुष्कळ जागा आहे, व महाराजानीं मनावर घेतल्यास त्यास पुष्कळ गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. परंतु सामाजिक सुधारणेचे जे एक खूळ केवळ इंग्रजी शिक्षणाने एकदेशीय बनलेल्या विद्वानाचे डोक्यांत असते त्याचीच थोडीबहुत छाया महाराजाचे मनावर पडल्यामुळे व त्यात कांहीं वेदोक्त, सामाजिष्ट, सुधारकप्रभृति मंडळीचा दुजेरा पडल्यामुळे हल्लीं सामाजिक सुधारणेच्या प्रवाहास बडोदें राज्यात अधिक अधिक ऊत येण्याचीं चिन्हें दिसू लागलीं आहेत. कायद्यार्ने सामाजिक चाली बंद करण्याची हाव इंग्रजसरकारनें बहुतेक सोडल्यासारखी आहे; व सन १९८१ सालीं संमतीवयाचे कायद्यासबंधानें जे रण माजलें त्याची आठवण बुजेपर्यंत इंग्रजसरकार पुन्हा असल्या पेंचाइतीत पडेल असें वाटत नाहीं. परंतु ज्या गोष्टी परकी इंग्रजसरकार करूं शकत नाहीं किवा इच्छित नाही, त्या देशी संस्थानांत करण्यास हरकत नाहीं. कारण, आमचेच दांत व आमचेच ओठ आणि तंटेबखेडे झाले तरी आमच्यामध्येंच, अशा विचारांचीं पुष्कळ माणसें हिंदुस्थानात आहत. कोल्हापुरातील वेदोक्त किंवा बडोद्यातील सामाजिक सुधारणा यांतील बीज येथेच आहे. कायद्याच्या सक्तीनें सुधारणा होऊं शकत नाहीं, हे तत्त्व इंग्रजी राज्यात तसेच संस्थानातही लागू असले पाहिजे. परंतु सुधारणेकरिता हापापलेल्या मंडळीस हें कळावें कसें ? सुधारणेची हाव, थोडाबहुत अधिकार व स्वत:च्या शहाणपणाची घमेड या तीन गोष्टी एकवटल्यावर हल्लींच्या बालविवाहाच्या कायद्यासारखीं फळे पुढे यावीत यांत नवल