पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वामी विवेकानंद हे समाधिस्थ झाले ! ३२९ मार्ग असल्यामुळे कोणत्याही धर्माशीं त्याचा विरोध नाहीं, इतकेंच नव्हे, तर सर्वानी ते घेण्यासारखे असून हें ज्ञान पिढीजाद ज्यांस प्राप्त झाले आहे त्यांनीं याचा प्रसार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असा ते उपदश करीत असत. हिंदुस्थानांतील लोकांची धर्माबद्दल ह्यगय पाहून त्याचे अंत:करण तिळतिळ तुटत असे, व धर्माची उन्नती झाल्याखेरीज राष्ट्र वर यावयाचे नाही, असा त्याच्या मनाचा ग्रह झालेला होता; व त्याकरिता त्याची जिवापाड मेहनत चालू असे. अमेरिकेत शिष्यपरंपरा स्थापून व अद्वैत मताच। प्रसार करून ते इकडे आल्यावर प्रथमतः सिलेोनमधून मद्रासैत आले; व तेथून कलकत्त्यात व हिमालयात त्यांचा अलमेोरा येथे मठ आहे तेथे गेले. या सफरीत त्याचा सर्वत्र जयजयकार होऊन त्यानी दिलेली व्याख्यानेंही कळकळीचीं आहेत. अमेरिकन लोकाच्या सहाय्यानेच त्यांनीं कलकत्त्यास हुगळीच्या काठी बेलूरमठ स्थापन करून तेथे आपल्या मताप्रमाणें धमॉपदेशक तयार करण्याची सोय केली आहे, व मठास जोडून रामकृष्ण परमहंस याचे समाधीमंदीर बाधले आहे. अलमेोरा येथे ‘प्रबुद्धभारत' पत्र निघत असे ते याच्याच मित्रमेडळीकडून निघत असे, व ९६॥९७ सालच्या दुष्काळांत राजपुतान्यात रामकृष्ण परमहंस मिशनची मेडळी जाऊन खिस्ती धर्मोपदेशकाच्या हातात बरीच अनाथ मंडळी पडण्याचे यानीं बंद केले, धमॉपदेशकाचा जितका भरणा असावा तितका शिष्यसंप्रदाय वाढला नसल्यामुळे हिंदुस्थानात सर्व ठिकाणीं आपले उपदेशक ठेवावे, अशी त्याची जी इच्छा होती ती सफल झाली नाहीं. तथापि कलकत्ता, अलमेरा, अजमीर. मद्रास वगरे ठिकाणीं त्यांचे उपदेशक असत. व अमेरिकेतही एक दान शिष्य राहत असत. १९०० सालीं पॅरिस येथे जें प्रदर्शन झालें त्यावेळीं सहा महिन्यात फ्रेंच भाषेचा अभ्यास करून स्वामी विवेकानंद यानी वेदात विषयावर तेथे व्याख्यान दिले होर्ते व त्याबद्दल त्याची तिकडच्या पत्नातून पुष्कळ प्रशंसा झाली होती. हल्लीं वर्षभर हे छातीच्या दुखण्याने अस्वस्थ होते, त्यामुळे जपानातून यास निमेंत्रण आले असताही तिकडे जाण्यास त्यास फावले नाही. गेल्या शुक्रवारीं नित्याप्रमाणें हे संध्याकाळीं फिरून आल व अस्वस्थता वाटल्यावरून शिष्यास हाक मारून आपण आता हा लोक सोडून जाणार, असे सागून त्रिवार दीघॉश्वास करून समाधिस्थ झाले, असें आम्हांस आलेल्या तारेवरून समजते. भर तारुण्यात स्वामी समाधिस्थ होण्याची वेळ यावी हें आमच्या देशाचे मोठेच दुदैव होय. श्रीरामकृष्ण परमहंस हे आमच्या इकडील अक्कलकोटच्या स्वामीप्रमाणे पुर ब्रह्मनिष्ठ होते खरे; पण सर्व जगातील देशात अद्वैत मताची पताका फडकत लावून हिदुधर्माची अर्थात् हिंदुलेोकाची महती सर्व जगभर करून धर्मसस्थापना कर ण्याचे काम श्री विवेकानंदानींच हाती घेतल होतें. व आपल्या विद्वत्तनें, वक्तृत्वानें, उत्साहानें व कळकळीने त्या कामाचा पाया त्यानी भक्कम घातला होता. ×8