पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ३० लो० टिळकांचे केसरीतील लेख. या पायावर इमारत उभी होऊन तिच्यावरील कळस स्वामी विवेकानंद यांच्याच हस्तानें बसविण्यात येईल अशी सर्वास आशा व उमेद होती. पण ती स्वामी समाधिस्थ झाल्यानें आता नाहीशी होण्याचा प्रसंग आला आहे. हिंदुधर्माचे उज्वल स्वरूप कोणते, अशा प्रकारचा धर्म आमच्या देशात झाला हैंच आमचे अमूल्य धन व बळ आणि त्याचा सर्व जगभर प्रसार करणें हेंच आमचे खर कर्तव्य असें बोलणारे नव्हे तर जगास सिद्ध करून दाखविणारे सत्पुरुष हजारबाराशे वर्षापूर्वी एक शकराचार्य होऊन गेले. व १९ व्या शतकाच्या अखेरीस दुसरे स्वामी विवेकानंद झाले. परंतु स्वामी विवेकानंदाचे काम अद्याप परिपूर्ण व्हावयाच आहे. व ते त्याच्या शिष्यवर्गापैकीं अगर दुसल्या कोणी तरी हाती घेऊन परिपूर्ण करावें, अशी आमची त्यास विनंति आहे. आमच्याजवळ जर काही महत्त्वाचा ठेवा असेल तर तो आमचा धर्मच होय. आमचे वैभव, आमचे स्वातव्य सर्व काहीं लुप्त झाले आहे. परंतु आमचा धर्म अद्याप आमचपाशी शिल्लक आहे; व ते असा तसा नव्हे तर सुधारलेल्या राष्ट्रांत उघड रीतीने कसोटीस लावला असताही त्याचा कस शुद्ध व उत्कृष्ट येतेो, हें आता अनुभवासं आलेले आहे. अशा स्थितीत जर आम्ही त्यास सोडून देऊं तर इसाबनितींतील कोंबड्याप्रमाणे आम्ही रत्नपारखी आहों अशी आमची सर्व जगभर नालस्ती हेोईल, हे लक्षात ठेवले पाहिजे. हल्लींचा कालच असा आहे कीं, आपल्याजवळ कोणतीही उत्तम वस्तू असली तर जगाच्या चढाओढीच्या व्यापारात ती मांडून तिची योग्यता स्थापन केली पाहिजे. स्वामी विवेकानंद यानीं हें काम केले होतें. आणि आमच्या सुदैवाने आणखी काहीं दिवस ते वांचते तर राष्ट्राला राष्ट्रीयत्व येण्यास जें काहीं तेज लागते ते थेोडेंबहुत तरी त्याच्यापासून आम्हास प्राप्त झाले असतै, असेो; त्याच्या कर्माप्रमाणे त्यास उत्तम गती प्राप्त होईल यात शंकाच नाहीच; पण त्यानी आम्हावर जे उपकार करून ठेवले आहेत त्याची उतराई होण्यास त्यानीं घालून दिलेलाच धड़ा आम्हास गिरविला पाहिजे, हें उघड आहे. करितां याच्या चरित्रावरून अशा त-हेची उत्तरोत्तर लोकाची प्रवृत्ति होवो अाणि सर्व धर्माचे अद्वैत मतात एकीकरण करण्याचे श्रेय आमच्या ऋषींच्या अर्वाचीन वशजासं प्राप्त हवी, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून स्वामी विवेकानंद यांचे हे स्वल्प चरित्र येथे समाप्त करितीं. अमेरिकेंतून परत आल्यावर पुण्यास येण्याबद्दल स्वामीना दोन तीन आमंत्रणे केली होतीं. पण एक दां स्वामी आजारी असल्यामुळे व दुस-या वेळीं कहीं अन्य कारणामुळे स्वामींचीं व्याख्यार्ने प्रत्यक्ष ऐकण्याचा योग पुणेकरांस आला नाही, हे मोठे दुदैव होय.