पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

球Rく लो० टिळकांचे केसरींतील लेख. असून इंग्रजीत प्रो. मॅक्समुलर यानीं तें लिहून काढले आहे. श्रीमत् रामकृष्ण हे १८८६ सालीं समाधिस्थ झाले. तेव्हां त्याचे पश्चात् त्याच्या अद्वैत मतांचा प्रसार करण्याचे काम त्यांच्या शिष्यशाखेने पत्करलें. व त्यात विवेकानंदही सामील होऊन त्यांनी अमेरिकेंतील लोकासही अद्वैत सिद्धाताची ओळख करून दिली. स्वामी विवेकानंद यानीं प्रथमत: कांही वर्षे केाणास न कळत म्हणजे आपले स्वरूप प्रगट न करिता हिमालय पर्वतात सिद्ध लोकास भेटण्यांस व हिंदुस्थानांतून प्रवास करण्यास घालविलीं. या अज्ञात प्रवासातच ते पुणे मुक्कामी सन १८९१॥ ९२ साली आले होते; व येथून महाबळेश्वरास जाऊन तेथून पुढे बेळगाव धारवाडहून मद्रास रामेश्वराकडे गेले. यास अमेरिकेंस पाठविण्याची कल्पना प्रथमतः मद्रासेंत निघून तेथील लोकानीं त्यास साह्य केलें; व सन १८९३ साली शिकागो प्रदर्शनाचे वेळीं तेथे जी मोठी राष्ट्रीय धर्मपरिषद झाली त्यात हिंदुधर्माच्या अद्वैत ज्ञानाची पताका अग्रस्थानी नेऊन लावण्याचे सर्व श्रेय स्वामी विवेकानंद याजकडे आहे. धर्मपरिषद सपल्यानंतर अमेरिकेत एक दोन वर्षे राहून तेथे त्यानी अद्वैत मताचा प्रसार केला व त्याचे मठ स्थापन करून तेथें शिष्यसप्रदायही सुरू केला. अमेरिकाखंड म्हणजे आज सर्व शास्त्राचे माहेरघर होय. अशा देशात खिस्ती धर्म गुरूच्या समक्ष अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करून अद्वैत मत प्रचलित करणें हें काम सामान्य पुरुषाच्या हातून निभावणे शक्य नाही. स्वामी विवेकानंद याचे असें मत असें की, हिंदुस्थानातील हिदुलोकास हिंदुत्व किवा हिदूधर्म हेच काय तें सामान्य बंधन आहे व या धर्मीतील तत्त्वें इतकी श्रेष्ठ आहेत की, हिंदुस्थानातच काय पण दुस-या केोणत्याही धर्माच्या लोकात किंवा देशात १९ व्या शतकाच्या अखेरीसही त्याचा प्रसार करणे शक्य आहे; इतकेच नव्हे तर असा प्रसार करणें हें हिंदुलोकांचे कर्तव्य होय. हिदु लोकांजवळ जर आता कांहीं अमोल वस्तू राहिली असली तर तो त्याचा धर्म होय. तो जर ते सोडतील तर ते आपणास जगाच्या निदेस व उपहास्यतेस पात्र करून घेतील. हिंदुधर्म काय आहे तो पुरा ओळखा, त्याचीं तत्त्वें काय आहेत याचा अभ्यास करा, तीं शास्राच्या कसोटीस लावा आणि सर्व जगभर त्याचा प्रसार करून आपले व आपल्या देशाचे नाव चिरस्मरणीय करा, असे उद्गार त्याच्या मुखातून अनेक वेळा निघाले आहेत. भक्ति हें धर्माचे मुख्य लक्षण खरें, पण अद्वैत ज्ञानाची त्यास जोड असल्याखेरीज धर्माचे स्वरूप लंगडे पडतें, असें त्याचे म्हणणे होतें. परधर्माविषयीं ते जेव्हा बोलत तेव्हा याच तत्त्वावर कटाक्ष ठेऊन बोलत असत. खिस्ती लोकास तुम्ही खिस्ती धर्म सोडून द्या, असा त्यानीं कधीही उपदश केला नाहीं. तुम्हीं खिस्तास भजा, परंतु तुमच्या धर्मात तत्त्वज्ञान नसल्यामुळे आमच्या हिंदूधर्मीतील अद्वैत सिद्धाताची त्यास जोड देणे अवश्य आहे. किंबहुना तुमच्या धर्मगुरूंनीही तींच तत्त्वें स्पष्टपणें नाहीं तरी अस्पष्टपणे लक्षांत ठेवून आपापल्या धर्माची रचना केली आहे,असे ते सांगत असत, साराश, ज्ञानयेोग, कर्मयोग किंवा राजयोग हे खच्या धर्माचे सार्वत्रिक