पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वामी विवेकानंद हे समाधिस्थ झाले ! ३२७

  • श्रीस्वामी विवेकानंद हे समाधिस्थ झाले !

श्रीमत् स्वामी विवेकानंद स्वामी हे कलकत्त्यास गेल्या शुक्रवारी आपल्या बेलूर मठात समाधिस्थ झाल्याची बातमी ऐकून हिदुधर्मविषयीं कळकळ बाळगणाच्या हजारें हिंदूस वाईट वाटल्यावाचून राहणार नाहीं. श्रीमत् विवेकानेद स्वामी याचे नाव ज्यास माहीत नाहीं असा हिंदु क्वचित्च सापडेल. एकोणिसावें शतक म्हणजे आधिभौतिक शास्त्राच्या उत्कर्षाचे उच्च स्थान मानले आहे. अशा प्रकारच्या शतकाच्या उत्तरार्धात हजारों वर्षापूर्वी हिंदुस्थानात प्रचलित असलेले आध्यात्मिक शास्र पश्चिमेकडील राष्ट्रातील विद्वानांस समजून सागून त्याच्याकडून सदर शास्राच्या अपूर्वतेबद्दल मान्यता मिळविण आणि ज्या राष्ट्रात अशा प्रकारचे शास्र निर्माण झाले, त्यातील लोकाबद्दल सहानुभूति उत्पन्न करणे, हें कांहीं लहान सहान काम नव्हे. पाश्चिमात्य आधिभौतिक शास्त्राचा ओघ इंझजी विद्येबरोबर इतक्या काहीं झपाट्यानै येत होता की, तो परतून लावण्यास असामान्य धैर्याचा व बुद्धिचा पुरुष उत्पन्न होणे जरूर होतें. थिऑसॉफिकल सोसायटीनें हे काम स्वामी विवेकानंदाच्या पूर्वी सुरूं केले होतें, पण त्याच्या उद्योगास अस्सल हिंदुत्वाचे स्वरूप स्वामी विवेकानंद यानींच प्रथम आणिले, ही गोष्ट निर्विवाद आहे. अलीकडे आमच्या देशातील शाळातून ज शिक्षण मिळते ते नेिवळ तार्कॉक असल्यामुळे धर्मविचाराची विद्याथ्यांच्या मनात जागृति न होता उलट स्वधर्मीचाच नव्हे तर, धर्ममात्राचीही टवाळी करण्यास ते प्रवृत्त होतात. स्वामी विवेकानंद याची लहानपणची वृत्ति अशाच प्रकारची होती. हे मूळचे बंगालचे राहणारे असून हल्ली याचे वय सुमारे ३५॥४० वर्षाचे असावें. म्हणजे त्यास जे शिक्षण मिळाले तें सुमारे २० वर्षाच्या पूर्वीचे हेतै; व एवढ्यावरून ते कसें होते याची वाचकास सहज कल्पना करता येईल. कारण, कलकत्त्याच्या इग्रजी शाळा आणि मुंबईपुण्याच्या इंग्रजी शाळा बहुतेक सारख्याच प्रकारच्या आहेत, असे म्हटलें तरी चालेल. स्वामीचे पूर्वाश्रमीचे नाव नरेद्रसेन असून हे जातीने क्षत्रिय होते, व अशी गोष्ट सागतात कीं, लहानपणीच एका जेोशानें यांची पत्रिका पाहून ** हा मुलगा कधीही गृहस्थाश्रम घेणार नाहीं. ” असें त्याच्या आईस कळविलें होतें. असेो; आपल्या वयाच्या १८॥१९ व्या वर्षी हे कलकत्ता युनिव्हर्सिटीची बी. ए. ची परीक्षा पास झाले. व तेव्हांपासूनच त्यांस तत्त्वज्ञानाचा नाद होता. पहिल्या पहिल्यानें यांची प्रवृत्ति नास्तिक मताकडे असे व पुष्कळ धर्मगुरूंशीं वादविवाद करताना **तुम्ही आपला देव तरी प्रत्यक्ष पाहिला आहे काय?' असा प्रश्न विचारून हे त्यास कुंठीत करीत असत. पण श्रीमत् स्वामी रामकृष्ण परमहंस याची गाठ पडल्या दिवसापासून याच्या बुद्धींत फरक झाला. आणि ते सदर स्वामींचे अखेर पट्टशिष्य होऊन संन्यासी बनले. श्रीमन् रामकृष्ण परमहंस याचे चरित्र सुप्रसिद्ध

  • [केसरी, ता, ८ जुलै १९०२]