पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिळक यांचे नागपूर येथील व्याख्यान. ३२३ ण्यास तयार आहेत तोंपर्यंत त्यांचे वेतन बंद करतां यावयाचे नाहीं. सार्वजनिक देवळे, धर्ममंदिरें, मठ वगैरेसंबंधानें हीच व्यवस्था अथवा तत्त्व लागू आहे. या ठिकाणच्या पूजाअर्चा बदलण्याचा कोणाईो संस्थानिकास अधिकार नाहीं. व हल्लींच्या पालटलेल्या मर्नूतील व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व घेतलें तरीही हृल्लीं कांही ठिकाणीं जे प्रकार होत आहेत ते न्यायदृष्टया कधीं योग्य ठरणार नाहीत. आमच्या संस्थानिकास हैं तत्त्व सागण्याची अाज आम्हींवर पाळी याबी ही मोठया दुःखाची गोष्ट आहे. हिंदु संस्थानातील हिंदु ज्ञातीज़ातमधील तंटे हिंदु राजास ति-हाइतपणें तोडता येऊं नयेत हे मोठे लाजिरवाणें होय; व या कामीं लोकास सार्वभौम सरकारची मदत घ्यावी लागली तर आमचे राज सुधारलेल्या पद्धतीनें राज्य चालविण्यास अद्याप पात्र झाले नाहींत याबद्दल दुसरा पुरावा शोधण्याची कांहीं जरूर राहाणार नाहीं. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून मराठे सस्थानिक आपलें वर्तन सोडतील अशी आम्हास उमेद आहे. महाराष्ट्रांत मराठे लोकांचा मान कमी आहे असें नाहीं, व तो वेदोक्त कर्म केल्यानें जास्त वाढेल असेंही नाहीं. तेव्हा विनाकारण खोट्या अभिमानास पडून मराठे संस्थानिकांनीं राजा या नात्यानें ति-हाइतपणाचा जेो त्याजकडे अधिकार आहे तो आवचारीपणाने घालवू नये एवढीच त्यास आमची विनंति आहे. बाकी मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यानीं तें खुशाल करावे, त्याचा हात धरणारा या कालात कोणी राहिला नाहीं; पण अमक्या ब्राह्मणांनीच तें आमच्या घरी केलें पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाहीं, किंवा देवालये किंवा देवस्थाने यांची पूर्वापार चालत आलली वहिवाट मोडता यावयाची नाही. हल्लीच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीनें हा विचार झाला. इतिहासाच्या दृष्टीनें काय निर्णय झालेला आहे तो पूर्वीच सांगितलेला आहे. तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर आमचे सस्थानिक चालतील तर या संबंधानें जास्त लिहिण्याची काहीं अावश्यकता पडणार नाही. निरनिराळ्या ज्ञातींतील लोकाचा सलोखा कसा व्हावा हें आम्हास पाहाणें आहे; व तशा दृष्टीनेंच या विषयावरील लेख आम्हीं लिहिले आहेत. ക്കു*--അ

  • रा० टिळक यांचे नागपूर येथील व्याख्यान

भगवद्गीता हा आपल्या आर्याचा नित्यपाठांत असणारा प्राचीन ग्रन्थ आहे, व आज हृजारो वर्षे आपलें या ग्रन्थावरचे प्रेम कायमचे दृढ आहे. भगवद्गीतेत वेदान्त सांगितला आहे, त्यात मोक्षप्राप्तीचा उपाय दिला आहे, इत्यादि या ग्रन्थाबद्दल बरीच मर्त प्रचलित आहेत; परंतु आजचे माझे विवेचन तद्विषयक नसून

  • (केसरी तारीख २१-१-१९०२ )